Mike Tyson vs Jake Paul: माजी हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन आणि यूट्यूबर-टर्न-फायटर जेक पॉल यांच्यात मुष्टीयुद्ध (Boxing) रंगणार आहे. जगभरातील अनेक चाहत्यांना आपापल्या आवडत्या मुष्टीयोध्याचे ठोसे आणि प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. टायसन सध्या 57 वर्षांचा आहे तर पॉल त्याच्याहून 30 वर्षांनी लहान, म्हणजेच त्या तूलनेत बराच तरुण. अत्यंत थरारक वाटावा असा हा सामना थेट पाहता येणार आहे. हा सामना 20 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) थेट प्रसारीत (Mike Tyson vs Jake Paul Live Streaming) केला जाणार आहे. अर्थात या लढतीचे पुरेसे तपशील अद्याप बाहेर आले नाहीत. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा सामना 80,000 आसनक्षमता असलेल्या AT&T स्टेडियमवर होणार आहे. सामन्याची तारीख जसजशी जवळ येईल तसतसा अधिकचा तपशील जारी केला जाणार आहे.
बॉक्सींग सामन्याच्या वृत्तामुळे सोशल मीडियात खळबळ
टायसन विरुद्ध पॉल अशा सामन्याचे वृत्त येताच सोशल मीडियावर जोरदार खळबळ उडाली. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार टायसनने आपल्या एकूण कारकीर्दीतील शेवटचा जाहीर सामना सन 2005 मध्ये खेळला होता. माईक टायसन हा त्याच्या काळातील सर्वात महान मुष्टीयोद्धा आहे आजही त्याची तीच ओळख आहे. 1985 ते 2025 अशी त्याची कारकीर्द राहिली आहे. जी अत्यंत वादग्रस्तही राहिली. सुरुवातीला त्याला 'आयर्न माईक' किंवा 'किड डायनामाइट' म्हणूनही ओळखले जात असे. नंतर तो 'द बॅडेस्ट मॅन ऑन ऑन' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याला मुष्टीयुद्धाच्या आखाड्यात आणि बाहेरही केलेल्या अनेक कृती आणि वर्तनांमुळे तुरुंगवासही भोगावा लागला तर कधी नियमांनुसार कारवाईला सामोरे जावे लागले. (हेही वाचा, Mike Tyson Comeback: 54 वर्षीय माईक टायसन बॉक्सिंग रिंगमध्ये करणार पुनरागमन, 'या' दिवशी जोन्स ज्युनिअरसोबत होणार लढत)
एक्स पोस्ट
'We signed the contract.' @netflix @MostVpromotions tions #PaulTyson pic.twitter.com/1H97Epxnkp
— Mike Tyson (@MikeTyson) March 7, 2024
युट्यूबर आणि बॉक्सर
जेक सोसेफ पॉल याच्याबद्दल सांगायचे तर तो एक अमेरिकन इंटरनेट सेलिब्रेटी आहे. तो व्यावसायिक बॉक्सरसुद्धा आहे. त्याने सप्टेंबर 2013 मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केली. जी एका वाईनवर व्हिडिओ पोस्ट करुन झाली होती. दरम्यान, ते अॅप बंद होण्यापूर्वी त्याचे फॉलोवर्स 5.3 दशलक्षाहून अधिक झाले होते आणि त्याच्या व्हिडिओला तब्बल 2 अब्ज व्ह्यूज मिळाले होते. नंतर पुढे सन 2014 मध्ये त्याने YouTube चॅनेल सुरू केले.
दरम्यान, दोन्ही मुष्टीयोद्ध्यांच्या म्हणजे बॉक्सरच्या वयामध्ये असलेले कमालीचे अंतर हेच अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबींदू आहे. तसेच, बॉक्सींगमधून बाहेरपडून टायसनलाही आता बराच काळ उलटून गेला आहे. त्यामुळे त्याचे वय, प्रकृती आणि इतर अनेक गोष्टींबाबत अनेकांना चिंता आहे. असे असले तरी, टायसनच्या वतीने तो एकदम तंदुरुस्त असल्याचे सांगितल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.