Photo Credit-X

Kho Kho World Cup 2025 Live Streaming: खो खो विश्वचषक 2025 (Kho Kho World Cup 2025)आज 13 जानेवारी रोजी सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि नेपाळ यांच्यात इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता खेळला जाईल. पुरुष आणि महिला गटात एकूण 23 संघ सहभागी होतील. भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतानसह अ गटात आहे. तर महिला संघ इराण, मलेशिया आणि कोरियासह गट अ मध्ये आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. (ICC Champions Trophy 2025 All Squads: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतापर्यंत 'या' देशांनी जाहीर केले संघ, एका क्लिकवर पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी)

गट आणि संघ

पुरुष आणि महिला संघांना प्रत्येकी चार गटात विभागण्यात आले आहे. पुरुष संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान यांना अ गटात स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स आणि इराण यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि पोलंड यांना गट क मध्ये स्थान देण्यात आले आहे तर इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि केनिया यांना गट ड मध्ये स्थान देण्यात आले आहे.

पहिला सामना कोणत्यासंघासोबत

उद्घाटन समारंभानंतर भारतीय पुरुष संघ नेपाळविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक 2025 ला सुरुवात करेल. तर महिला संघ मंगळवारी कोरियाविरुद्ध पहिला सामना खेळेल. खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (केकेएफआय) ने पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी 15 खेळाडूंच्या संघांची घोषणा केली आहे.

भारतीय संघाचे कर्णधार

प्रतीक वायकर भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करेल. भारतीय महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे करणार आहे. 2025 च्या खो-खो विश्वचषकात, स्पर्धेची सुरुवात गट टप्प्यापासून होईल. यानंतर नॉकआउट फेऱ्या खेळवल्या जातील. खो-खो विश्वचषक 2025 चे अंतिम सामने 19 जानेवारी रोजी होणार आहेत.

भारतीय संघ:

भारतीय पुरुष खो-खो संघ: सुयश गरगटे, प्रतीक वायकर (कर्णधार), रामजी कश्यप, शिवा पोटीर रेड्डी, प्रभानी साबर, मेहुल, सचिन भार्गो, आदित्य गणपुले, गौतम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमण्य व्ही, सुमन बर्मन, अनिकेत. पोटे, एस. रॉक्सन सिंग. स्टँडबाय - विष्णुनाथ जानकीराम, अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील.

भारतीय महिला खो-खो संघ: प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, भिल्लर देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्र आर, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नाजिया बीबी, नसरीन शेख, मीनू , मोनिका. स्टँडबाय: संपदा मोरे, प्रियंका भोपी, रितिका सिलोरिया.

भारतात 2025 चा खो-खो विश्वचषक कोणत्या चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

भारतात होणाऱ्या खो-खो विश्वचषक 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर असेल. याशिवाय, ते स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

भारत आणि नेपाळमधील सामना कधी आणि कुठे पाहायचा?

भारतात होणारा पुरूषांचा खो-खो विश्वचषक सामना आज 13 जानेवारी रोजी भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता प्रसारित केला जाईल.