भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांना डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खेळल्या जाणार्‍या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20I मालिकेने होईल. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल आणि दोन कसोटींचा समावेश असलेल्या गांधी-मंडेला ट्रॉफीसाठी स्वातंत्र्य मालिकेसह समाप्त होईल. हे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

पहिला T20 सामना: रविवार, 10 डिसेंबर - हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम, डर्बन

दुसरा T20 सामना: मंगळवार, 12 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गाकेबेराहा

तिसरा T20 सामना: गुरुवार, 14 डिसेंबर - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

पहिला एकदिवसीय: रविवार, 17 डिसेंबर - बेटवे पिंक डे - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

दुसरी वनडे: मंगळवार, 19 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गेबेराहा

तिसरी वनडे: गुरुवार, 21 डिसेंबर - बोलंड पार्क, पार्ल

पहिली कसोटी: 26-30 डिसेंबर - सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन

दुसरी कसोटी: 03-07 जानेवारी - न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)