जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षक, खेळाडू यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक स्पोर्ट्स कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने कोरोनाग्रस्तांसाठी खास पाऊल उचलले आहे. त्याने खास पोस्ट करत सर्वांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पोर्तुगालमधील आपल्या Pestana CR7 या हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. (क्रिस्टियानो रोनाल्डो चे इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स, टॉप-10 मध्ये आहे 'या' दोन दिग्गज फुटबॉलपटुंचाही समावेश)
या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असून डॉक्टर्स, नर्सेस आणि कोरोनाग्रस्तांना लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींचा खर्चही खुद्द रोनाल्डो करणार आहे. ही सुविधा पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल, अशा प्रकराचे वृत्त अनेक स्पॅनिश आणि इटालियन न्युज पोर्टलर्सने दिले आहे.
पहा पोस्ट:
याशिवाय कोरोना व्हायरसमुळे दगावलेल्या रुग्णांसाठी रोनाल्डो याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या Juventus क्लब मधील कोरोनाची लागण झालेल्या टीममेटला देखील त्याने मदत केली होती. तसंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन कडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्याने सर्व चाहत्यांना केले आहे.