क्रिस्टियानो रोनाल्डो चे इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स, टॉप-10 मध्ये आहे 'या' दोन दिग्गज फुटबॉलपटुंचाही समावेश

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो इंस्टाग्रामवर 200 मिलियन म्हणजे 20 करोड फॉलोअर्स मिळवणारा पहिला माणूस ठरला आहे. हा पराक्रम गाजवणारा तो पहिला व्यक्ती आहेत. या पोर्तुगीज फुटबॉलरच्या नंतर अमेरिकन गायिका एरियाना ग्रान्डे ज्याला 17.3 दशलक्ष चाहते फॉलो करत आहेत.

क्रिस्टियानो रोनाल्डो चे इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स, टॉप-10 मध्ये आहे 'या' दोन दिग्गज फुटबॉलपटुंचाही समावेश
क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo Credits: Instagram/@cristiano)

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवर (Instagram) 200 मिलियन म्हणजे 20 करोड फॉलोअर्स मिळवणारा पहिला माणूस ठरला आहे. हा पराक्रम गाजवणारा तो पहिला व्यक्ती आहेत. या पोर्तुगीज फुटबॉलरच्या नंतर अमेरिकन गायिका एरियाना ग्रान्डे (Ariana Grande) ज्याला 17.3 दशलक्ष चाहते फॉलो करत आहेत. पहिल्या दहामध्ये तीन फुटबॉलर्स, तीन गायक आणि तीन अभिनेत्यांचा समावेश आहे. रोनाल्डोपेक्षास्वत: इंस्टाग्रामचे 33 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पहिल्या दहामध्ये रोनाल्डोव्यतिरिक्त अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) 8 व्या स्थानी आहे तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार (Neymar) दहाव्या क्रमांकावर आहे. मेस्सीचे 14.1 कोटी आणि नेमारचे 13.2 कोटी फॉलोअर्स आहेत. याशिवाय हॉलीवूडचा स्टार आणि कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) 170 दशलक्ष फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. (चैंपियंस लीग मॅचदरम्यान मैदानात घुसला फॅन आणि पकडली क्रिस्टियानो रोनाल्डो याची मान, भडकलेल्या पुर्तगाली फुटबॉलरने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा हा Video)

रोनाल्डोने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. रोनाल्डो लिहिले, 'वाह 200 दशलक्ष!!! माझ्याबरोबर दररोज हा प्रवास करणाऱ्या प्रत्येकजणाचा धन्यवाद!!" अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत क्रिस्टियानो ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वाधिक फॉलो केला जाणार सेलिब्रिटी बनला होता. सध्या सेलेना 16.7 दशलक्ष फॉलोअर्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

 

View this post on Instagram

 

Wow 200 million!!! Thank you to each and every one of you for sharing this journey with me every day!!👏🏽❤️

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

इतकच नाही, इंस्टाग्राम मार्केटींग कंपनी हॉपर मुख्यालयाच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा कर्णधार रोनाल्डो इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला की त्याद्वारे 9 दशलक्ष युरो किंवा सुमारे सात कोटी रुपये कमावतो. अशाप्रकारे केवळ रोनाल्डोने इन्स्टाग्रामवरुन 3 अब्ज 78 कोटी 45 लाख 60 हजार रुपये कमावले आहेत, जे त्याच्या क्लब जुव्हेंटसकडून मिळणाऱ्या रकमेपेक्षा (अंदाजे अडीच अब्ज)अधिक आहे. रोनाल्डोनंतर मेस्सी हा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2020 02:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).