चेन्नई येथे यंदाचा 44 वा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही द्विवार्षिक बुद्धिबळ स्पर्धा आहे ज्यामध्ये अनेक राष्ट्रे एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतात. इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE) या स्पर्धेचे आयोजन करते आणि यजमान राष्ट्र निवडते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून, कोविड-19 मुळे ही स्पर्धा ऑनलाइन होत होती. या वर्षी, भारत देशाच्या इतिहासात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. रशियाकडून यजमानपद हिसकावून घेतल्यानंतर आता 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड यंदा चेन्नई येथे होणार आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाकडून होस्टिंग हिसकावण्यात आले. चेस ऑलिम्पियाड 2022 चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. एकूण 187 देश आणि 343 संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. खुल्या विभागात 189 संघ आणि महिला विभागात 154 संघांची नोंदणी केली आहे. आता या स्पर्धेचा अधिकृत शुभंकर (Mascot) म्हणून 'थांबी' (तमिळमध्ये धाकटा भाऊ) नावाचा तपकिरी घोडा घोषित केला आहे.
याआधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमादरम्यान या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे अधिकृत शुभंकर आणि लोगो लॉन्च केले. शुभंकर 'थांबी' हा पारंपारिक तमिळ पोशाख वेस्ती (धोती) आणि शर्ट परिधान केलेला शूरवीर आहे आणि तो हात जोडून उभा आहे. हा शुभंकर तामिळ अभिवादन 'वनक्कम' चा संदर्भ देतो. त्याच्या शर्टवर 'चेस बिलीव्ह' असा शब्द लिहिलेला आहे.
44th Chess Olympiad Mascot: All You Need to Know About 'Thambi' Ahead Of 2022 FIDE Event in Chennai#ChessOlympiad2022 #Thambi #ChessChennai2022 @FIDE_chess @chennaichess22https://t.co/RXa0dNLTSf
— LatestLY (@latestly) July 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)