65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा धाराशिवमध्ये रंगणार आहे. 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पाच दिवस ही स्पर्धा चालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिली आहे.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने राज्यात रंगणाऱ्या मानाची स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या 65व्या हंगामाची तारीख जाहीर केली आहे. धाराशिवमध्ये 65व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जाहीर केलेल्या या स्पर्धेत 900 खेळाडू सहभागी होणार आहेत. (हेही वाचा - Gautam Gambhir On IND vs PAK: 'मैत्री बाहेरच राहिली पाहिजे', भारत-पाक खेळाडूंच्या मैत्रीपूर्ण वृत्तीवर गौतम गंभीर संतापला)
यावर्षी धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच या स्पर्धेचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्कॉर्पियो, बुलेट, टॅक्टरसह २ कोटींची बक्षीस दिले जाणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि उस्मानाबाद तालीम संघ यांच्यावतीनं या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा खिताब पृथ्वीराज पाटीलने जिंकला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने विशाल बनकरला आसमान दाखवत विजेतेपद पटकावले. या सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.