IPL 2021 Auction: कमी बेस प्राईज असलेल्या ‘या’ 3 खेळाडूंवर आयपीएल लिलावात पाडू शकतात पैशांचा पाऊस, बनू शकतात करोडपती
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगने (Indian Premier League) गुरुवारी आयपीएल लिलावात (IPL Auction) यशस्वीरित्या प्रवेश केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. आयपीएल (IPL) 2021 लिलावात नामांकित 292 खेळाडूंवर 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे बोली लगावली जाईल. आयपीएल 2021 चा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता सुरू होईल. सुरुवातीला चेन्नई येथे आयपीएल लिलावासाठी 1,114 खेळाडूंनी नोंदणी केली मात्र, आयपीएलच्या आठ फ्रँचायझींनी क्रिकेटर्सच्या शॉर्टलिस्ट खेळाडूंची छाटणी केली. आयपीएलच्या लिलावात यंदा काही नवीन तर अनेक ओळखीचे चेहरे दिसणार आहेत. स्टिव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजारा, ग्लेन मॅक्सवेल आणि आरोन फिंचसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू लिलावाच्या रिंगणात उतरले आहेत यंदा अनेक युवा खेळाडूंवर फ्रँचायझींचे लक्ष लागून असेल. आज आपण अशाच खेळाडूंवबद्दल जाणून घेऊया ज्यांची बेस प्राईस कमी आहे मात्र, लिलावात ते करोडपती बनू शकतात. (IPL 2021 Auction Oldest Player: आयपीएल लिलावात भाग घेणारे Nayan Doshi यंदाचे Aged खेळाडू, पहा त्यांची क्रिकेट कारकीर्द)

1. मोहम्मद अझरुद्दीन

यंदा आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागवण्यासाठी केरळचा आक्रमक सलामी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन प्रमुख दावेदार मानला जात आहे. विकेटकीपर-ओपनर अझरुद्दीनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीने चर्चेत आला. मुंबईविरुद्ध 137 धावांच्या खेळीमुळे त्याने अनेक फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले असेल. अझहरुद्दीनची बेस प्राईस 20 लाख रुपये आहेत.

2. केदार देवधर

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा देवधर देखील यंदा लिलावात मोठी कमाई करू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये त्याने आठ सामन्यात 349 धावा केल्या होत्या. देवधरचा स्ट्राईक रेट तितका उच्च नसला तरी, त्याचे सातत्य अनेक संघांसाठी फायदेशीर ठरू शकते. देवधरने आपली बेस प्राईस 20 लाख इतकी ठेवली आहे.

3. अवि बरोट

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत केलेल्या कामगिरीने सौराष्ट्रचा 28 वर्षीय फलंदाज सर्व फ्रँचायझींच्या रडारवर असेल. त्याने 185 च्या प्रभावी स्ट्राईक-रेटने 5 डावात 32 चौकार आणि 12 षटकार ठोकले असून त्याने एक शतक आणि अर्धशतक झळकावत स्पर्धेत 283 धावा केल्या. गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 122 धावा केल्या तर विदर्भाविरूद्ध त्याचे शतक हुकले. आतापर्यंत कोणत्याही आयपीएल संघाने 28 वर्षीय फलंदाजाला विकत घेतले नाही. परंतु, या हंगामात केलेल्या तुफान कामगिरीनंतर तो नक्कीच काही खरेदीदारांना आकर्षित करेल.