IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी 168 धावांचे आव्हान, रोहित शर्मा 'हिट'
(Photo by Henry Browne/Getty Image)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघामधील दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने विंडीजसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले. आजच्या या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सलामीची जोडी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharm) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित-शिखरांची भागीदारी जमत असताना धवन 23 धावा करत बाद झाला. त्याच्यानंतर रोहितने कर्णधार विराटचा साथीने संघाचा डाव सावरला. रोहितने याच सामन्यात आपापले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्यानंतर रोहित 67 धावा करून माघारी परतला. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल याला मागे टाकत रचला विश्वविक्रम)

रोहितच्या मागोमाग रिषभ पंत आणि नंतर कोहली देखील बाद झाले. पंत यंदाच्या संयत देखील प्रभावी खेळी करत अयशस्वी राहिला. त्याने 5 चेंडूत 4धावा केल्या. आणि नंतर मोठा शॉट मारण्याच्या नादात झेल बाद झाला. आजच्या सामन्यात भारताची फळी पुन्हा एकदा चांगली खेळी करू शकली नाही. रोहित आणि धवनच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली. आणि अखेरीस कृणाल पंड्या याच्या शेवटच्या ओव्हरमधल्या फटकेबाजीमुळे संघाला मोठी धाव संख्या उभारता आली. वेस्ट इंडिजसाठी शेल्डन कॉटरल आणि ओशन थॉमस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर किमो पॉल याला एक विकेट मिळाली. आजच्या या सामान्य हिटमॅन रोहितने 3 षटकार मारत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकारांचा विक्रम मोडीत काढला. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितने आजवर 107 तर गेलने 105 षटकार मारले आहेत.

शनिवारी खेळण्यात आलेल्या दोन्ही संघातील सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. पण मागील सामनात फलंदाजांनी निराशा केली होती. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी प्रभावी खेळी केली होती. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी याने उत्कृष्ट कामगिरी बजावली.