आयपीएल 2023 चा चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. रविवारी (2 एप्रिल) दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघ आमनेसामने असतील. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान संघाची कमान संजू सॅमसनच्या हाती असेल, तर भुवनेश्वर कुमार सनरायझर्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. वास्तविक, सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्कराम पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. प्रोटीज फलंदाज मार्करामच्या अनुपस्थितीमुळे SRH नक्कीच थोडा कमकुवत असेल, परंतु तरीही या संघाकडे चांगले पर्याय आहेत.
मार्करामच्या जागी एसआरएच संघ किवी विकेटकीपर फलंदाज ग्लेन फिलिप्सला संधी देऊ शकतो. SRH चे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण आयपीएलच्या इतर संघांपेक्षा मजबूत आहे. फिरकीपटूंमध्येही या संघात आदिल रशीद आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे खेळाडू आहेत. फलंदाजीतही आघाडीची फळी मजबूत आहे. एकूणच, SRH चा संघ बराच संतुलित आहे. हेही वाचा CSK vs GT: केन विल्यमसनच्या जागी 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स देखील खूप मजबूत संघ आहे. या संघाचा फिरकी विभाग इतर संघांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. फलंदाजीतही त्याचे टॉप-5 फलंदाज मजबूत आहेत. शेपूट फलंदाज आणि वेगवान गोलंदाजी आक्रमणात थोडी कमजोरी असली तरी. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा या सामन्यात वरचष्मा दिसत आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सपाट आहे. म्हणजेच येथे फलंदाजांना चांगली मदत मिळत आहे. येथे पाठलाग करणे सोपे झाले आहे. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे संघांना आवडते. येथे झालेल्या मागील दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघालाच यश मिळाले आहे. हेही वाचा Goal in Saree: नऊवारी घालून फुटबॉल खेळणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल, पहा व्हिडिओ
SRH चे संभाव्य प्लेइंग-11: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), आदिल रशीद, उमरान मलिक, टी नटराजन.
RR चे संभाव्य प्लेइंग-11: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिककल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ओबेद मॅककॉय, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.