
आयपीएल (IPL) 2023 चा 18 वा सामना 13 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात गुजरातने एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. प्रथम खेळताना पंजाबने 8 बाद 153 धावा केल्या. गुजरातने विजयासाठी दिलेले 154 धावांचे लक्ष्य 19.5 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील गुजरात टायटन्सचा हा तिसरा विजय ठरला. या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फारसा आनंदी नव्हता. त्याने संघाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले.
पंजाब किंग्जविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'खरं सांगायचं तर, आम्ही ज्या परिस्थितीत होतो, त्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत सामना नेण्यात मी दाद देणार नाही. या सामन्यातून नक्कीच खूप काही शिकायला मिळाले. हेच खेळाचे सौंदर्य आहे. तो संपेपर्यंत संपत नाही. मधल्या षटकांमध्ये आम्ही आणखी संधी घेऊ शकलो असतो. हेही वाचा PBKS vs GT, IPL 2023: सॅम करनने शेवटच्या षटकात वाढवला थरार, गिलला केले क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ
मोहित शर्मा आणि अल्झारी जोसेफ यांनी चांगली गोलंदाजी केली. पण सामना शेवटच्या षटकापर्यंत नेणारा मी फार मोठा चाहता नाही. पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. IPL 2023 मध्ये गुजरातने 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तीन जिंकले आहेत आणि एक हारला आहे.
हार्दिक पंड्याचा संघ 6 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL 2023 मध्ये गुजरातने विजयाने सुरुवात केली. 31 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या मोसमातील सलामीच्या सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला. यानंतर पुढच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव झाला. तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. चौथ्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव झाला.