ज़िम्बाब्वें वि. पाकिस्तान (Photo: @ZimCricketv/@TheRealPCB)

Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 3rd ODI 2024 Live Streaming:  झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना गुरुवार, 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो (Bulawayo)  येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने DLS पद्धतीचा वापर करून पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकून झिम्बाब्वे संघ मालिकेवर कब्जा करू इच्छितो. दुसरीकडे, पाकिस्तान संघाला तिसरी वनडे जिंकून मालिकाही जिंकायची आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.  (हेही वाचा  -  ICC Rankings: जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर 1 गोलंदाज ठरला, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीचीही मोठी झेप, येथे पहा नवीन क्रमवारी)
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 वाजता बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. तर नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे.

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा वनडे कुठे पाहायचा?

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचे प्रसारण झाल्याची कोणतीही माहिती नाही. तथापि, झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान T20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून तिसऱ्या वनडेचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघ

झिम्बाब्वे संघ: तादिवनाशे मारुमनी, डिओन मायर्स, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, ब्रायन बेनेट, फराज अक्रम, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, जॉयलॉर्ड गाम्बी, ट्रेवोरिंग, ट्रेवोरिंग , टिनोटेंडा मापोसा

पाकिस्तान संघ: सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), तय्यब ताहिर, आगा सलमान, इरफान खान, कामरान गुलाम, आमेर जमाल, शाहनवाज दहनी, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, फैसल अक्रम, अबरार अहमद, अहमद दानियल. हसिबुल्ला खान