
Yuzvendra Chahal Rented A Luxury Apartment In Mumbai: क्रिकेटर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) मुंबईत 3 लाख प्रति महिना रकमेवर एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. 4 फेब्रुवारी रोजी हा करार झाला. दोन वर्षांचा कालावधीसाठी हे घर त्याने भाड्याने घेतले आहे. त्यासाठी त्याने 10 लाखांची सुरक्षा ठेव दिली आहे. ही सर्व माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. 1399 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अपार्टमेंट अंधेरी वेस्टमधील ट्रान्सकॉन ट्रायम्फ येथे आहे. Chahal-Dhanashree Divorce: घटस्फोटासाठी न्यायालयात गेल्यावर युजवेंद्र चहलचा Be Your Own Sugar Daddy कोट्स असलेला टी-शर्ट का चर्चेत आला? जाणून घ्या
सुरी नताशा याचे हे अपार्टमेंट आहे. सुरी नताशा या अभिनेत्री, सुपरमॉडेल, टीव्ही होस्ट आणि माजी मिस वर्ल्ड इंडिया राहिल्या आहेत. मार्चमध्ये, कॉरिओग्राफर आणि कंटेंट क्रिएटर धनश्री आणि युजवेंद्र यांचा घटस्फोट झाला. त्याआधी त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. ज्यामुळे ते विभक्त होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये गुरुग्राममध्ये एका खासगी समारंभात लग्न केले होते.
कोविड-19 महामारी दरम्यान डान्स शिकण्यासाठी युजवेंद्रने धनश्रीकडे क्लासेस घेतले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी लग्न केले. लग्नाच्या अवघ्या 20 महिन्यातच त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर घटस्फोट होईपर्यंत ते वेगळेच राहत होते.
झॅप्कीने सादर केलेल्या मालमत्ता कागदपत्रांनुसार, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्यांची मुंबईतील मालमत्ता 13.5 कोटी रुपयांना विकली होती. स्क्वेअर यार्ड्सच्या माहितीनुसार, केएल राहुल आणि सासरे सुनील शेट्टी यांनी ठाणे पश्चिम येथील ओवाळे येथे संयुक्तपणे 9.85 कोटी रुपयांना सात एकर जमीन खरेदी केली आहे. त्याशिवाय, रोहित शर्माने मुंबईतील लोअर परेल येथे त्यांची मालमत्ता 2.60 लाख रुपये प्रति महिना भाड्याने नुकतीच दिली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड परिसरात 11 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि त्यांची पत्नी देविशा यादव यांनी मुंबईतील देवनार परिसरात 21.1 कोटी रुपयांना दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते.