(Photo Credits: IANS)

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात फायनलमध्ये (ICC Women’s T20 World Cup 2020 FINAL) प्रवेश केला आहे. यामुळे भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विश्वचषकात भारतीय महिला संघाने चांगले प्रदर्शन करून दाखवली आहे. तसेच 8 मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातही भारतीय महिला संघ उत्तम कामगिरी करून भारताला विश्वचषक जिंकून द्यावा, अशी सर्वांचीच अपेक्षा आहेत. यातच भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी अंतिम सामन्या आधीच भारतीय महिला संघाला विजयी सल्ला दिला आहे. तसेच विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला संघाने काय केले पाहिजे, अशीही माहिती सचिन तेंडुलकर यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि या स्पर्धेत एकही सामना गमावाला नाही. परंतु, अंतिम सामना होम ग्राऊंडमध्ये होणार असल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे भारतापुढे मोठे आव्हान आहे.

सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी भारतीय महिला संघाशी आपला अनुभव शेअर केला आहे. तसेच अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने मैदानात असताना काय केले पाहिजे, याची योग्य माहिती त्यांना दिली आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर म्हणाले की, भारतीय महिला संघाने पहिल्यादाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यामुळे भारतीय संघ दबावात सामना खेळाण्याची अधिक शक्यता आहे. भारतीय महिला संघाने प्रथमता दबाव एका बाजूला ठेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरावे. भारतीय संघाने साखळी सामन्यात चांगली कामगिरी करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, मी भारतीय महिला संघाला विश्वचषकासोबत पाहणे अधिक पसंत करेल, असे सचिन तेंडूलकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- ICC Women’s T20 World Cup: ऑस्ट्रेलिया संघाचा फायनलमध्ये प्रवेश, दक्षिण आफ्रिकेला केले 5 धावांनी पराभूत; भारताशी होणार अंतिम सामना

भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या फाइनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, भारताचा ऑस्ट्रेलियासोबत अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ साहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश करत असल्यामुळे भारतीय महिला संघासमोर मोठे आव्हान आहे. कारण, आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4 विश्वचषक जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2010, 2012, 2014, 2018 मधील विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.