Women's T20 WC 2024 Schedule Announced: महिला टी-20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कोणत्या दिवशी होणार भारताचे सामने
Womens Team India (Photo Credit - Twitter)

Women's T20 WC 2024 Schedule: आज आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी बांगलादेश टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. महिला टी-20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथे होणार आहे. सर्व संघ आपापल्या गटात 4-4 सामने खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. (हे देखील वाचा: IPL 2024 Points Table: आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 विकेट्सने केली मात, पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप)

महिला टी-20 विश्वचषक 2024 साठी गट

अ गट- भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, क्वालिफायर 1.

ब गट- बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, क्वालिफायर 2.

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

भारतीय महिला क्रिकेट संघ 4 ऑक्टोबर रोजी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना 6 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर, भारतीय संघ 9 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर 1 सोबत खेळेल. 13 ऑक्टोबरला टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.