
RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025चा 47 वा (IPL 2025) सामना 28 एप्रिल रोजी म्हणजेच, राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. (हे देखील वाचा: RR vs GT IPL 2025 47th Match: यशस्वी जयस्वालकडे मोठी संधी, अशी कामगिरी करणारा ठरणार राजस्थानचा पाचवा फलंदाज)
हेड टू हेड आकडेवारीच कोण आहे वरचढ?
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी गुजरात संघाने 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, राजस्थान संघाला फक्त एकच सामना जिंकण्यात यश आले आहे. अशा परिस्थितीत, जर आपण आकडेवारी पाहिली तर आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध गुजरात टायटन्सचा वरचष्मा आहे. चालू हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने 58 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातकडून साई सुदर्शनने 82 धावा केल्या आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना जिंकण्याची शक्यता (RR vs GT Google Win Probability)
या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ वरचढ असल्याचे दिसून येत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः गुजरात टायटन्सच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. गुजरात टायटन्सच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, ते स्पर्धेतील 47 वा सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
गुजरात टायटन्स जिंकण्याची शक्यता: 58%
राजस्थान रॉयल्सच्या विजयाची शक्यता: 42%.
दोन्ही संघाची संभाव्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स: शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, आकाश मधवाल, संदीप शर्मा, तुषार देशपांडे/शुभम दुबे