ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 चे वेळापत्रक कधी जाहीर होईल? बीसीसीआयच्या बैठकीत मोठा खुलासा
ODI World Cup 2023 (Photo Credit - Twitte)

क्रिकेट विश्वचषक या वर्षाच्या (ODI World Cup 2023) अखेरीस भारतात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले असून सर्व क्रिकेट चाहते दररोज या स्पर्धेच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) आज म्हणजेच शनिवारी एसजीएमची बैठक घेतली. ज्यामध्ये विश्वचषक वेळापत्रक आणि आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक लंडनमधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jai Saha) यांनी शनिवारी बोर्डाच्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर (एसजीएम) ही माहिती दिली.

आशिया कपबाबतही निर्णय घेतला जाईल

आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी येथे आलेले आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य आशिया चषकाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. विश्वचषकापूर्वी आशिया चषक स्पर्धा होणार आहे. (हे देखील वाचा: Gujarat Titans Road To Final: मुंबई इंडियन्सचा पराभव करून गुजरात टायटन्स आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये पोहोचले, येथे जाणून घ्या 'जीटी'चा या मोसमाचा कसा होता प्रवास)

जय शहा यांचे मोठे वक्तव्य

शाह म्हणाले की आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दरम्यान पत्रकार परिषदेत केली जाईल. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले जाईल. ते म्हणाले की, आशिया चषक 2023 चे भवितव्य कसोटी खेळणारे देश आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे सहयोगी राष्ट्र सदस्य यांच्यातील बैठकीनंतर ठरवले जाईल.

आणखी अनेक स्टेडियम जोडले जातील

चाहत्यांसाठी योग्य सुविधा लक्षात घेऊन 15 स्टेडियम्सची निवड करण्यात आली असून आणखी काही स्टेडियम नंतर जोडण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सचिवांनी दिली. या कामाची जबाबदारी ग्रँट थॉर्नटन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआय आठवडाभरात काही विशेष समित्याही जाहीर करेल जे भारतात होणाऱ्या विश्वचषक आणि महिला प्रीमियर लीगशी संबंधित काम हाताळतील.