Virat Kohli (Photo Credit - Twitter)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा (RCB) अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा असून त्याने आता आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात 600 चौकार मारण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आज आपल्या अर्धशतकी खेळीत 5 चौकार मारले आणि 600 हून अधिक चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. (हे देखील वाचा: Shardul Thakur बनला रिकी पाँटिंग आणि शेन वॉटसनच्या मुलांचा प्रशिक्षक, व्हिडिओ झाला व्हायरल)

आयपीएल कारकिर्दीत 6903 धावा 

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीत 6903 धावा आहेत ज्यात 5 शतके आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 229 षटकार आणि 603 चौकार मारले आहेत. शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक 730 चौकार मारण्यात आघाडीवर आहे. शिखर धवनच्या नावावर एकूण 144 षटकार असले तरी चौकार मारण्याच्या बाबतीत तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. धवननंतर डेव्हिड वॉर्नरचाही विक्रम आयपीएलमधील सर्वोत्तम ठरला आहे. चौकार मारण्याच्या बाबतीत तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत 608 चौकार आहेत, पण त्याने 200 हून अधिक षटकारही मारले आहेत.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून केल्या 6500 धावा 

कर्णधार म्हणून, विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 6500 हून अधिक धावांचा टप्पा गाठला आहे आणि एक कर्णधार म्हणून T20 क्रिकेटमध्ये 6500 धावांचा टप्पा पार करणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे. विराट कोहलीने आपल्या 186 व्या डावात हा पराक्रम केला, आज पंजाब किंग्ज विरुद्ध त्याने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार होता आणि यादरम्यान त्याने हा मोठा विक्रम केला.