ICC World Cup 2019 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा 15 एप्रिलला मुंबईत होणार
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credit: Twitter)

आपल्या सर्वांना उत्सुकता असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) साठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा 15 एप्रिल रोजी मुंबईत करण्यात येईल. 30 मे पासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल. दीड महिने वर्ल्ड कपचे सामने रंगणार असून 14 जुलैला अंतिम सामना पार पडेल. वर्ल्ड कपमध्ये यंदा 10 संघांचा समावेश आहे. वर्ल्ड कप टूर्नामेंटचे उद्घाटन 30 मे रोजी 'द ओव्हल' मैदानात इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका संघाच्या सामन्याने होईल. वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना खेळावला जाणार, ICC ने दिले स्पष्टीकरण

ANI ट्विट:

भारतीय क्रिकेट संघाचे सामने:

5 जून- दक्षिण आफ्रिका

9 जून- ऑस्ट्रेलिया

13 जून- न्युझीलंड

16 जून- पाकिस्तान

22 जून- अफगाणिस्तान

27 जून- वेस्टइंडिज

30 जून- इंग्लंड

2 जुलै- बांग्लादेश

6 जुलै- श्रीलंका

नक्की वाचा:  2019 World Cup साठी भारतीय क्रिकेट संघाला सचिन तेंडुलकरने  दिल्या शुभेच्छा (Watch Video)

वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे इंग्लंड मधील 11 शहारात- लॉर्ड्स, ओव्हल, एजबेस्टन, ट्रेंट ब्रिज, टॉन्टन, हॅडिंग्ले, ओल्ड ट्रेफोर्ड, ब्रिस्टल, साऊथम्पटन, कार्डिफ आणि चेस्टर ली स्ट्रीट येथे खेळले जातील.