Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs AUS 2nd Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट (Border-Gavaskar Trophy 2023) स्पर्धेत खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने (Team India) दिल्ली कसोटी जिंकली तर त्यांच्या नावावर मोठा विक्रम होईल. असा विक्रम जो जगभरातील संघ करू शकले नाहीत. जर टीम इंडियाने दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते तिन्ही फॉरमॅटच्या आयसीसी क्रमवारीत नंबर वन बनेल. सध्या भारतीय संघ वनडे आणि टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ आहे आणि जर भारतीय संघाने 17 तारखेपासून दिल्लीत खेळवण्यात येणारा सामना जिंकला तर कसोटी क्रमवारीतही ते नंबर वन बनेल.

असे कधी घडले नाही

आम्ही तुम्हाला सांगतो की आजपर्यंत टीम इंडिया कधीही एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनलेली नाही. म्हणजेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन होण्याचा विक्रम फक्त दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिका 2013 मध्ये एकाच वेळी वनडे, कसोटी आणि टी-20 मध्ये नंबर वन संघ बनला होता. आफ्रिकन संघानंतर पुन्हा कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test Delhi Pitch Report: कशी आहे दिल्लीची खेळपट्टी? गोलंदाज किंवा फलंदाज जाणून घ्या येथे कोणाला मिळते सर्वाधिक मदत)

आता अशी आहे क्रमवारी?

सध्याच्या आयसीसी कसोटी क्रमवारीवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियन संघ 126 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 115 रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय इंग्लंडचा संघ 107 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, दुसरी कसोटी जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ जाईल.