SRH Vs MI, IPL 2020: सनरायजर्स हैदराबाद संघाचा 10 विकेट्सने दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सला पराभूत करत प्ले-ऑफमध्ये धडक
Sunrisers Hyderabad Team (Photo Credits: IANS| FIle)

SRH Vs MI, 56th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या संघावर (Sunrisers Hyderabad Vs Mumbai Indians) 10 विकेट्स विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात केवळ 149 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करत हैदराबादच्या संघाने 18 व्या षटकात विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादच्या संघाने प्ले-ऑफमध्ये धडक दिली आहे.

हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. दुखापतीमुळे गेले काही सामन्याला मुकलेला रोहित शर्माला या सामन्यात काही खास कामगिरी बजावता आली नाही. केवळ 4 धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर डी कॉक (25), सुर्यकुमार यादव (36), इशान किशन (33), कृणाल पांड्या (0), सौरभ तिवारी (1) झटपट आऊट झाले. मात्र, अखेर शेवटच्या टप्प्यात किरोन पोलार्डने 2 चौकार आणि 4 षटकार खेचत 41 धावा केल्या. ज्यामुळे मुंबईच्या संघाला 149 पर्यंत मजल मारता आली. हे देखील वाचा- IPL 2020: सनरायजर्स हैदराबादचा संदीप शर्मा याने झहीर खान याला टाकले मागे; पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रचला विक्रम

 आयपीएलचे ट्विट-

या आव्हानाचा पाठलाग करताना करताना हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर-प्लेच्या षटकांत अर्धशतकी भागीदारी करत संघाला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला आहे. दरम्यान, डेव्हिड वार्नरने नाबाद 85 धावा केल्या आहेत. वृद्धिमान साहा नाबाद 58 धावा केल्या आहेत.