नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी (Photo Credit: Twitter/@IPL)

SRH vs KKR IPL 2021 Match 3: आयपीएल (IPL) 2021 च्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने नितीश राणा (Nitish Rana), राहुल त्रिपाठीचे (Rahul Tripathi) अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) फटकेबाजी शानदार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 187 धावांचा डोंगर उभारला आणि सनरायझर्स हैदराबादपुढे विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. केकेआरचा (KKR) सलामी राणाने जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्रिपाठीने 53 तर शुभमन गिलने 15 धावा केल्या. संघासाठी माजी कर्णधार कार्तिक 22 धावा करून नाबाद परतला. मागील हंगामात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या आंद्रे रसेलचा खराब फॉर्म सुरुवातीच्या सामन्यात देखील पाहायला मिळाला. नाईट रायडर्सचे फलंदाजांनी सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि हैदराबाद गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसरीकडे, हैदराबादकडून राशिद खान आणि मोहम्मद नबी यांना प्रत्येकी 2 गडी बाद केले तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (SRH vs KKR IPL 2021: केकेआरचा स्टार फलंदाज Rahul Tripathi याचे खणखणीत अर्धशतक, आयपीएलमध्ये केला हा खास विक्रम)

टॉस गमावून पहिले बॅटिंग जाणाऱ्या कोलकातासाठी राणा आणि गिलच्या जोडीने संघाला शानदार सुरुवात करून दिली. दोंघांनी अर्धशतकी भागीदारी करत पॉवर-प्लेमध्ये बिनबाद 50 धावा केल्या. यानंतर राशिदने केकेआरला पहिला धक्का दिला. राशिदने ओपनर शुबमन गिलला 15 धावांवर बोल्ड करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं. त्यांनतर, नितीश राणाने सिक्स खेचत 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान राहुल त्रिपाठीने राणाला चांगली साथ दिली आणि जोरदार फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. त्रिपाठीने चौकार ठोकत अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पण, अर्धशतकी खेळीनंतर राहुलला नटराजनने विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या हाती कॅच आऊट केलं. राशिद खानने आंद्रे रसेलला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत कोलकाताला तिसरा धक्का दिला. यानंतर नाईट रायडर्सच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरूच झाले आणि हैदराबाद गोलंदाजांनी संघाला पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करून दिलं.

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याबद्दल बोलायचे तर हैदराबाद संघाला आजवर या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांचा या मोसमातील पहिलाच सामना असल्याने यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा निर्धार असणार आहे.