SRH vs KKR IPL 2021 Match 3: कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय
डेविड वॉर्नर आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

SRH vs KKR IPL 2021 Match 3: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या तिसऱ्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत होणार आहे. डेविड वॉर्नरचे (David Warner) सनरायझर्स आणि इयन मॉर्गनचे (Eoin Morgan) नाईट रायडर्स यांच्यातील सामनाचे न्नईच्या (Chennai) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघाचा आजचा आयपीएल (IPL) 14 मधील पहिला सामना आहे. आजच्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 14 व्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्याचा मानस दोन्ही संघाचा असणार आहे त्यामुळे दोन्ही संघाने जबरदस्त प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. लक्ष्य घेण्यासारखे म्हणजे कोलकाता संघाने अखेर 2012 मध्ये चेपॉकवर सामना जिंकला होता तर वॉर्नरच्या हैदराबादlला या स्टेडियमवर सर्व 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. (How to Download Hotstar & Watch SRH vs KKR IPL 2021 Match 3: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल?)

कोलकाता संघाकडून आजच्या सामन्यातून हरभजन सिंह (Harbhajan Singh) डेब्यू करत आहे तर हैदराबादसाठी मागील मोसमात फक्त चार सामने खेळलेला भारताचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असल्याने नाईट रायडर्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये भज्जीसह शाकिब अल हसनचा समावेश केला आहे. दुसरीकडे, वॉर्नरसह हैदराबादसाठी रिद्धिमान साहा सलामीला येईल तर जॉनी बेअरस्टोवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी असेल. शिवाय, संघात मोहम्मद नबी आणि रशिद खानच्या रूपात दोन फिरकीपटू देखील आहेत.

पहा हैदराबाद-कोलकाताचा प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, विजय शंकर, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, हरभजन सिंह, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स आणि प्रसिद्ध कृष्णा.