South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team, 1st Test Match Day 4 Scorecard: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) पहिला सामना 26 डिसेंबरपासून खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे खेळला गेला. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या मालिकेत टेंबा बावुमा (Temba Bavuma) दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तान संघाची कमान शान मसूदकडे (Shan Masood) आहे. (हेही वाचा - PAK Beat SA 3rd ODI 2024: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर रचला इतिहास, 'हा' टप्पा गाठणारा ठरला जगातील पहिला संघ)
SA विरुद्ध PAK सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा:
1st Test - Pakistan vs South Africa
South Africa won by 2 wickets.
Pakistan: 211 & 237
South Africa: 301 & 150-8 (39.3 ov)
Scorecard: https://t.co/WLse5QBubF#SAvPAK
— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) December 29, 2024
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नऊ षटकांत तीन गडी गमावून 27 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 19 धावांत संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 39.3 षटकांत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 40 धावांची खेळी खेळली. टेंबा बावुमाशिवाय सलामीवीर एडन मार्करामने 37 धावा केल्या.
त्याचवेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बासने सर्वाधिक सहा बळी घेतले. मोहम्मद अब्बासशिवाय खुर्रम शहजाद आणि नसीम शाह यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पाकिस्तानचा पहिला डाव
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 56 धावा करून संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 57.3 षटकात केवळ 211 धावांवरच गारद झाला होता. पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली.
या खेळीदरम्यान कामरान गुलामने 71 चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकार ठोकला. कामरान गुलामशिवाय आमेर जमालने 28 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले मोठे यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेकडून डॅन पॅटरसनने सर्वाधिक ५ बळी घेतले. डॅन पॅटरसनशिवाय कॉर्बिन बॉशने चार बळी घेतले. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घ्यायला आवडेल.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावा करून संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 73.4 षटकांत 301 धावा करत सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात 90 धावांची आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करामने 89 धावांची शानदार खेळी केली.
या उत्कृष्ट खेळीदरम्यान एडन मार्करामने 144 चेंडूत 15 चौकार लगावले. एडन मार्करामशिवाय कॉर्बिन बॉशने नाबाद 81 धावा केल्या. त्याचवेळी खुर्रम शहजादने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून खुर्रम शहजाद आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. खुर्रम शहजाद आणि नसीम शाह यांच्याशिवाय आमेर जमालने दोन गडी बाद केले.
पाकिस्तानचा दुसरा डाव
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने 22 षटकात विकेट गमावून 88 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 59.4 षटकात 237 धावा करत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 84 धावांची शानदार खेळी केली.
या उत्कृष्ट खेळीदरम्यान सौद शकीलने 113 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला. सौद शकीलशिवाय बाबर आझमने 50 धावा केल्या. त्याचवेळी स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सनने सर्वाधिक सहा बळी घेतले. मार्को जॉन्सनशिवाय कागिसो रबाडाने दोन बळी घेतले.