विराट कोहली (Photo Credit: PTI)

Shane Watson ‘Big 5’ Test Batters: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल 5 फलंदाज कोण, हा वाद कधीच संपू शकत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन (Shane Watson) याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) इतर सर्व खेळाडूंपेक्षा पुढे ठेवले आहे. वॉटसनच्या यादीत विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम (Babar Azam) यांचा जगातील पहिल्या पाच फलंदाजांमध्ये समावेश आहे. बाबरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उदय होण्यापूर्वी फक्त चार अव्वल खेळाडूंचा फॅब-4 मध्ये समावेश होता. मात्र बाबर आजमने आपल्या तुफान फलंदाजीने या यादीत आपली जागा मिळवली आहे.

कोहली त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. आणि आता वॉटसनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 5 सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला नंबर 1 च्या सिहांसनावर बसवले आहे. लक्षणीय आहे की विराटने 2019 पासून कसोटी सामन्यात एकही शतक झळकावले नाही. ICC च्या मासिक पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये वॉटसनने कोहलीला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट यांच्या पुढे स्थान दिले आहे. कोहलीबद्दल बोलताना शेन वॉटसन म्हणाला की तो खूप चांगली फलंदाजी करतो, त्याच्यात सामने फिरवण्याची क्षमता आहे. कोहलीने 101 कसोटी सामन्यांच्या 171 डावांमध्ये 49.95 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत, परंतु 2019 पासून तो एकही शतक झळकावू शकला नाही. कोहलीच्या उत्कृष्ट फलंदाजीचे सर्वांनाच वेड लावले आहे.

वॉटसनने दुसऱ्या बाबरला बसवले आहे. आजमने 40 कसोटी सामन्यांच्या 71 डावांमध्ये 45.98 च्या सरासरीने 2851 धावा केल्या आहेत. बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खूप धावा केल्या. बिग फाईव्हच्या यादीत कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्यात सक्षम स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 85 सामन्यांच्या 151 डावात 8010 धावा केल्या आहेत. त्यांनतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहे. विल्यमसनने 86 कसोटी सामन्यांच्या 150 डावांमध्ये 53.57 च्या सरासरीने 7272 धावा केल्या आहेत. स्मिथ आणि विल्यमसन यांची फलंदाजीची सरासरी कोहलीच्या तुलनेत चांगली असली तरी वॉटसनने त्यांना कोहलीच्या खाली स्थान दिले आहे. वॉटसनने इंग्लंडचा कर्णधार रुटला तळाशी ठेवले आहे. इंग्लिश कर्णधाराने 117 कसोटी सामन्यांच्या 216 डावांमध्ये 49.19 च्या सरासरीने 9889 धावा केल्या आहेत.