England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 25 धावा करुन 1 विकेट गमावून 256 धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या 193 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर जो रूटने इंग्लंडचा डाव सांभाळला. इंग्लंडचा पहिला डाव 102 षटकात 427 धावांवर संपुष्टात आला.
A dominant Day 2 for England at Lord's 💪#ENGvSL scorecard: https://t.co/kKZqez3EmQ pic.twitter.com/SCHwJ339PN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 30, 2024
इंग्लंडकडून जो रूटने 167 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे शतक आहे. इंग्लंडकडून जो रूटने 143 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. जो रूटच्या गस ऍटकिन्सनने 118 धावा केल्या. या खेळीदरम्यान, गस ऍटकिन्सनने 115 चेंडूत चार षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने सर्वाधिक 5 बळी घेतले. असिथा फर्नांडोशिवाय मिलन प्रियनाथ रथनायके आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55.3 षटकात केवळ 196 धावा करू शकला. श्रीलंकेकडून कामिंडू मेंडिसने सर्वाधिक 74 धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, मॅथ्यू पॉट्स, गस ऍटकिन्सन आणि ऑली स्टोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता इंग्लंडकडे एकूण 256 धावांची आघाडी आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत पकड ठेवली आहे.