प्रत्येक क्रिकेटप्रेमीला मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अम्पायर स्टीव बकनर (Steve Bucknor) यांच्या मैदानातील टसन बद्दल माहिती असेल. जेव्हा केव्हा सचिन फलंदाजी करत असे तेव्हा स्टीव बकनर त्यांना आऊट नसतानाही आऊट म्हणून घोषित करत असतं. असे एकदा नाही तर अनेकदा झाले आहे.
याच आठवणींना उजाळा देत आयसीसी (ICC) ने स्टीव बकनर आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो बनवून ट्विट केला आहे. या फोटोवर मास्टर बास्टरने ही आपली खास प्रतिक्रिया दिली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
अलिकडेच सचिन आपला बालमित्र विनोद कांबळी सोबत नेट प्रॅक्टीस करत होता. याचा एक व्हिडिओ सचिनने ट्विटवर शेअर केला आहे. त्यात बॉलिंग करताना सचिनचा पाय त्याचा रेषेच्या पुढे पडतो. याच व्हिडिओतील फोटो घेऊन स्टीव बकनर नो बॉल चा इशारा देत असतानाचा फोटो आयसीसीने ट्विट केला आहे आणि ट्विटमध्ये लिहिले की, "तुझ्या पायाकडे लक्ष दे."
ICC ट्विट:
Watch your front foot, @sachin_rt 😜 pic.twitter.com/eZ4N8mKGME
— ICC (@ICC) May 12, 2019
यावर सचिनने चांगले उत्तर दिले आहे. सचिनने लिहिले की, "या क्षणी तरी मी बॉलिंग करत आहे. बॅटींग नाही. पण अम्पायरचा निर्णय हा नेहमीच अंतिम निर्णय असतो."
At least this time I am bowling and not batting 😋 .. umpire’s decision is always the final decision. ☝🏻
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 15, 2019
विनोद कांबळी सोबत शिवाजी पार्क येथे नेट प्रॅक्टीस करताना सचिनने जुन्या आठवणींना उजाळा देत खास ट्विट केले. त्याने लिहिले की, लंच ब्रेकमध्ये विनोद सोबत पुन्हा एकदा नेट प्रॅक्टीस करताना फार छान वाटले. याने आम्हाला आमच्या शिवाजी पार्क येथील बालपणीच्या आठवणीत नेले. खूप कमी लोकांना माहित आहे की, विनोद आणि मी नेहमीच एका टीममध्ये असायचो. आम्ही कधीच एकमेकांविरुद्ध खेळलो नाही.