RR vs DC IPL 2021 Match 7: कगिसो रबाडाचे आगमन तर बेन स्टोक्सची अनुपस्थिती, पहा दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing XI
राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

RR vs DC IPL 2021 Probable Playing XI: आयपीएल (IPL) 2021 मध्ये दोन युवा यष्टिरक्षक गुरुवारी आमनेसामने असतील. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सातव्या होणाऱ्या सामन्यात एकीकडे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन (Sanju Samson) तर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रिषभ पंतकडे  (Rishabh Pant) असेल. दोन्ही खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करत आहेत आणि त्यांचा दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. दिल्ली संघाने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून विजयाची चव चाखली आहे, तर राजस्थानला रोमांचक पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहेत. सामन्याआधी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे आजच्या लेखात आपण सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते याबद्दल जाणून घेणार आहोत. (IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेचा Anrich Nortje आढळला COVID-19 पॉसिटीव्ह)

सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला यापूर्वी जोफ्रा आर्चरच्या बाहेर पडल्याने हंगामाच्या सुरूवातीला जोरदार धक्का बसला होता आणि आता त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स देखील दुखापतीमुळे स्पर्धेतुन बाहेर पडला आहे. स्टोक्सची जागा घेण्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोन आघाडीचा दावेदार आहे. याशिवाय, रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही आहे. जोस बटलर सलामीला येत लिव्हिंगस्टोन मधल्या फळीत फलंदाजीला मैदानात उतरू शकतो. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हनमधेही एक बदल होऊ शकतो. चेन्नई सुपर किंग्स विरोधात चेंडूने महागडा सिद्ध झालेल्या टॉम कुरन डच्चू देत उपलब्ध असल्यास कगिसो रबाडा संघात कमबॅक करू शकतो. दरम्यान, दोन्ही संघ आयपीएलमध्ये आजवर 22 सामन्यात टक्कर झाली असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हनः संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, मनन वोहरा, लियाम लिव्हिंगस्टोन, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, क्रिस वोक्स आणि आवेश खान.