RR vs DC IPL 2021 Match 7 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, व कसा पाहणार? वाचा सविस्तर
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

RR vs DC IPL 2021 Match 7 Live Streaming: आयपीएलमध्ये (IPL) दोन युवा विकेटकीपर-कर्णधार आमनेसामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सामना रंगणार आहे. दिल्लीचं कर्णधारपद रिषभ पंतकडे (Rishabh Pant) आहे तर राजस्थानने संजू सॅमसनच्या (Sanju Samson) हाती नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये टीमचं नेतृत्व करत असल्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांमधील आयपीएलचा सातवा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  खेळला जाईल. मॅचला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 7.00 वाजता होईल. राजस्थान आणि दिल्लीचा आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. (RR vs DC IPL 2021 Match 7: कगिसो रबाडाचे आगमन तर बेन स्टोक्सची अनुपस्थिती, पहा दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing XI)

चेन्नई सुपर किंग्स विरोधात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यातील विजयासह दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरेल, तर पंजाब किंग्सविरुद्ध विशाल धावसंख्येचा पाठलाग करत पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही संघ आजवर 22 वेळा आमनेसामने आले असून दोघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत. तथापि, टी-20 लीगच्या मागील, आयपीएल 2020, आवृत्तीत दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामने जिंकून रॉयल्सवर वर्चस्व गाजवले होते. अशास्थितीत, हे दोन्ही संघांमधील सामना मनोरंजक असेल कारण दोघेही सामना जिंकण्यासाठी उत्सुक असतील.

पहा राजस्थान आणि दिल्ली संघ

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहीम, चेतन सकारिया, के.सी. करियप्पा, लियाम लिविंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह.

दिल्ली कॅपिटल्स: अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत (कॅप्टन), शिखर धवन, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, क्रिस वोक्स, एनरिच नॉर्टजे, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, लुकमान हुसेन मेरीवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज, प्रवीण दुबे, विष्णू विनोद.