आरसीबी कर्णधार विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात सर्वाधिक धावा करणारा यशस्वी फलंदाज आहे आणि आयपीएल 2021 मध्ये या  प्रतिष्ठित लीगमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज देखील ठरला आहे. तसेच आयपीएलच्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे, पण विराट कोहलीच्या नावावर आयपीएलचा एक लाजीरवाणी विक्रमही नोंदविला गेला आहे. लीगमध्ये हरलेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली आघाडीवर आहे. म्हणजेच लीगच्या 13 वर्षाच्या इतिहासात आरसीबी (RCB) संघाने जितके सामने गमावले आहेत त्यामध्ये विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. (IPL 2021: छोटा पॅकेट मोठा धमाका! 20 लाखात फ्रँचायझींने दिली संधी, पण कोट्यवधींची कामगिरी करत ‘हे’ 3 युवा रातोरात बनले आयपीएल स्टार)

लीगच्या आजवरच्या इतिहासात हरलेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार आणि धाकड फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने त्याच्या नावावर या लीगमध्ये 6000 पेक्षा अधिक धावा आहेत ज्यापैकी 2802 धावा त्याने संघात पराभवात केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा तसेच त्याच्या संघासाठी पराभवात देखील सर्वाधिक धावांच्या बाबतीतही विराट अव्वल क्रमांकावर आहे तर शिखर धवन या प्रकरणात दुसर्‍या क्रमांकावर आहे. धवनने हरलेल्या सामन्यात एकूण 2225 धावा केल्या आहेत. या प्रकरणात आयपीएलमधील आजवरचा यशस्वी विदेशी फलंदाज डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर रॉबिन उथप्पा चौथ्या स्थानावर आहेत. विराट कोहलीचा आरसीबी साथीदार एबी डिव्हिलियर्स या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या नावावर 2218 धावा तर उथप्पाच्या नावावर 2205 धावा आणि डिव्हिलियर्सच्या नावावर पराभूत झालेल्या सामन्यात एकूण 1993 धावांची नोंद आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगचा 2021 हंगाम भारतात तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरस प्रकरणे आढळल्यावर अनिश्चित काळासाठी स्थागित करण्यात आला आहे. यंदाच्या लीगमध्ये 29 सामने खेळवण्यात आले होते जेव्हा काही खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे फ्रँचायझीने कळवले होते. त्यानंतर, बीसीसीआयने तात्काळ बैठक घेत काही काळासाठी यंदाच्या आयपीएलवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. अशास्थितीत यंदा टी-20 वर्ल्ड कप सोबत संघांचे अनेक विदेश दौरे होणार असल्यामुळे यंदाचं आयपीएल लांबणीवर गेल्याच दिसत आहे.