आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 42व्या सामन्यात आज (28 सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians Vs Panjab Kings) आज आमने-सामने येणार आहेत. शेख जायद मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करीत आहे. तर, पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी के एल राहुल (K L Rahul) संभाळत आहे. या सामन्यात अनेक मोठे विक्रम बनण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- DC Vs KKR, IPL 2021: बॉल अडवताना रिषभ पंतची दिनेश कार्तिकला लागली बॅट, पाहा व्हिडिओ
मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ त्याचा अकरावा सामना खेळणार आहेत. तसेच दोन्ही संघाचे 8 गुण आहेत. परंतु, चांगल्या रन रेटच्या आधारावर पंचाबचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर, मुंबईचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई आणि पंजाब हे संघ 27 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यापैकी मुंबईने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, पंजाबच्या संघाने 13 वेळा मुंबईवर मात केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दुसरीकडे पंजाबने दुसऱ्या टप्प्यात 2 सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
खालील विक्रम बनण्याची शक्यता-
भारताचा सलामीवर रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमधील 400 वा षटकार ठोकण्यापासून षटकार दूर आहे. महत्वाचे म्हणजे, 400 षटकारांचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा पहिला भारतीय ठरेल.
दक्षिण अफ्रिकेचा क्विंटन डी कॉक टी-20 क्रिकेटमधील 7000 धावांचा टप्पा गाठू शकतो. या विक्रमापासून तो केवळ दोन धावा दूर आहे. तसेच 7000 धावांचा टप्पा गाठणारा दक्षिण अफ्रिकाचा तो चौथा खेळाडू ठरेल.
कृणाल पंड्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 50 विकेट्स गाठण्यासाठी आणखी एका विकेटची गरज आहे. पोलार्डनंतर तो 1000+ धावा करणारा आणि मुंबई इंडियन्ससाठी 50+ विकेट घेणारा दुसरा मुंबई इंडियन्स खेळाडू ठरेल.
पंजाब किंग्जसाठी 100 षटकार पूर्ण करण्यासाठी केएल राहुलला दोन षटकारांची गरज आहे. PBKS साठी असे करणारा तो पहिला फलंदाज असेल.
पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी 36 धावांची गरज आहे. जर गेलने आजच्या सामन्यात 36 धावा केल्या तर ही कामगिरी करणारा तो सातवा खेळाडू ठरेल.
मुंबई आणि पंजाब यांच्यात होणार आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकतो आणि कोणत्या संघाला पराभव स्विकारावा लागतो? हे सामन्याच्या अखेरच स्पष्ट होईल.