
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, 34th Match TATA IPL 2025 Key Players: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2025) 18 व्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS)हे संघ एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा सामने खेळले आहेत. आरसीबीने चार सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जनेही आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत.
या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
विराट कोहली: आरसीबीचा घातक फलंदाज विराट कोहलीने गेल्या 10 डावांमध्ये 425 धावा केल्या आहेत. या काळात विराट कोहलीने 161.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. विराट कोहलीचे टायमिंग आणि क्लासिक शॉट्स सामना आरसीबीच्या बाजूने वळवू शकतात.
रजत पाटीदार: आरसीबीचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रजत पाटीदारने 345 धावा केल्या आहेत आणि त्याचा 194.91 चा स्ट्राईक रेट कोणत्याही गोलंदाजासाठी धोक्याचा इशारा आहे. रजत पाटीदार लयीत आला की तो षटकारांचा वर्षाव करू शकतो.
जोश हेझलवूड: आरसीबीचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूडने गेल्या 9 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. जोश हेझलवूडचे अचूक यॉर्कर आणि स्विंग फलंदाजांना त्रास देऊ शकतात.
श्रेयस अय्यर: पंजाब किंग्जचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर या हंगामात संघाचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. मधल्या फळीत त्याची फलंदाजी सामन्याला स्थिरता देते आणि जेव्हा जेव्हा संघाला जलद धावांची आवश्यकता असते तेव्हा अय्यर सर्वोत्तम कामगिरी दाखवतो.
युजवेंद्र चहल: अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल नेहमीच विकेट घेण्याच्या मानसिकतेने गोलंदाजी करतो. कोलकाताच्या मधल्या फळीला तोडण्यात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. चहलचा अनुभव आणि विविधता त्याला या सामन्यात पंजाबचा ट्रम्प कार्ड बनवू शकते.
अर्शदीप सिंग: पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नवीन चेंडूने आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. त्याचे अचूक यॉर्कर आणि स्विंग चेंडू विरोधी फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.