आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बीसीसीआयने अखेर इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League)) 2021 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम, कोलकाता कॅम्पमध्ये COVID-19 प्रकरणांमुळे रडारवर आला होता. दुर्दैवाने, केकेआर कॅम्पमधील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर व्हायरसने बाधित आहेत. पुढे, सीएसके चेन्नई कर्मचारी देखील संक्रमित झाले. 4 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅम्पमधून कोरोना व्हायरस प्रकरणांशी संबंधित बातमी आली त्यानंतर अखेर आयपीएल निलंबित करण्यात आले आहे. पण 29 आयपीएल सामन्यानंतरही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले विशेषतः ते काही दिग्गजांपेक्षा चांगले खेळले. अशा खेळाडूंना आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय संघात (Indian Team) कमबॅक किंवा पदार्पणाची संधी मिळू शकते. (IPL 2021 स्थगितीनंतर आता T20 वर्ल्ड कपवर टांगती तलवार, ‘या’ देशात खेळवण्याचा आहे पर्याय)
पृथ्वी शॉ
ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान केलेल्या भीषण कामगिरीनंतर पृथ्वी शॉला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पृथ्वी शानदार फॉर्ममध्ये होता त्यानंतर रिकी पॉन्टिंगने यंदाच्या मोसमात दिल्लीसाठी त्याला सलामीला पाठवले आणि आपल्या संघाला उत्कृष्ट सुरुवात करण्यात तो यशस्वी ठरला. आतापर्यंत खेळलेल्या आठ खेळांमध्ये शॉने 308 धावा केल्या. त्यामुळे, यंदाच्या वर्षअखेरीस होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी तो भारतीय संघासाठी एक पर्याय म्हणून उपलब्ध असेल.
दीपक चाहर
आयपीएलच्या कामगिरीमुळे दीपक हा भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या अनेक खेळाडूंपैकी एक असू शकतो. बुमराह आणि नटराजनच्या उपस्थितीमुळे कोणालाही नियमितपणे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे कठीण झाले असले तरी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा चाहरने ठसा उमटवला आहे. यावर्षी त्याने सीएसकेकडून 7 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टी -20 वर्ल्ड कप दरम्यान चाहरला नियमितपणे टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
हर्षल पटेल
2021 हे हर्षल पटेलसाठी खास वर्ष ठरले. मोसमातील पहिल्या सामन्यादरम्यान पटेलने गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरूद्ध पाच बळी घेतले. नंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करायला सांगितले, एक सामना सोडल्यास, त्याने प्रत्येकी वेळी आयपली योग्यता सिद्ध केली आहे. पटेल यॉर्कर्स गोलंदाजी करू शकतो आणि त्याचे स्लो चेंडू कोणत्याही फलंदाजासाठी वाचण्या इतके कठीण असतात. त्याच्यासारखा गोलंदाज कोणत्याही संघासाठी मौल्यवान ठरू शकतो आणि टीम इंडियाबद्दल बोलल्यास तो त्यांची गोलंदाजी अधिक आक्रमक बनवू शकतो.
राहुल चाहर
2019 पासून राहुल चहार मुंबई इंडियन्सचा प्रीमियर स्पिनर राहिला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये जरी राहुल महागडा ठरला असता तरी परंतु, त्याने केवळ 3 टी-20 सामना खेळल्यामुळे त्यांची संख्या सुधारण्याचे लक्ष्य आहे. सध्या तो प्रति ओव्हर 9.5 धावांच्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत आहे. 2020 च्या मोसमात त्याने 15 सामन्यात 8.16 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, सध्याच्या मोसमात त्याने 7 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय संघात लेग स्पिनरची उपस्थिती एक मोठी उपयुक्तता आहे त्यामुळे विराट कोहली राहुलचा महत्त्वपूर्ण विकेट मिळवण्यासाठी वापर करू शकतो.
आवेश खान
आवेश 2016 मजबूत भारतीय अंडर-19 संघाचा भाग होता. मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघात नियमितपणे खेळू न शकणाऱ्या आवेशला आयपीएल 2021 ने लोकप्रियता मिळवून दिली. त्याने आठ सामन्यात 14 विकेट काढल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीची गुरुकिल्ली म्हणजे त्याची फिटनेस. टी -20 वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघात स्थान मिळवण्याची त्याच्याकडे उत्तम संधी आहे.