PC-X

IPL Orange Cap Winners List: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) 22 मार्चपासून सुरू होईल. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. दरवेळीप्रमाणे यावेळीही आयपीएलमध्ये अनेक मनोरंजक डाव पाहायला मिळतील. सुरुवातीपासूनच आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. या वर्षी अनेक दिग्गज ही कॅप मिळविण्याच्या शर्यतीत असतील.

शॉन मार्श हा ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला खेळाडू होता. मार्शने 2008 मध्ये 616 धावा केल्या होत्या. याशिवाय, सलग दोन हंगामात (2011 आणि 2012) ऑरेंज कॅप जिंकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. गेल व्यतिरिक्त, फक्त दोन खेळाडू विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अनेक वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा वॉर्नर हा एकमेव फलंदाज आहे.

सचिन तेंडुलकर (2010) हा ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता. ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या इतर भारतीयांमध्ये विराट कोहली, रॉबिन उथप्पा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. ऑरेंज कॅप आणि आयपीएल जिंकण्याची दुहेरी कामगिरी फक्त रॉबिन उथप्पा (KKR, 2014) आणि रुतुराज गायकवाड (CSK, 2021) यांनीच केली आहे. एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 मध्ये विराटने 973 धावा केल्या.