Photo Credit- X

IND vs PAK ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) भारताकडून सहा विकेटने झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा (IND vs PAK) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. त्याने अक्षरश: पाकिस्तानच्या  व्यवस्थापनाचे (PCB) वाभाडे काढले. पीसीबीचे बुद्धीहीन आणि अज्ञानी व्यवस्थापन पराभवाला कारणीभूत असल्याच त्याने म्हटल आहे. 'इथं अनुभवी लोकांना संधी दिली जात नाही, नव्यांना कस खेळाव माहित नाही', असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.

सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत शोएब अख्तर म्हणाला की, ‘मी निराश झालो नाही. कारण, मला माहित होते की पुढं काय होणार आहे. जग प्रत्येकी सहा गोलंदाज खेळवत असते, तुम्ही पाचवा गोलंदाज निवडत नाही. तेव्हा हे असच होणार होत. मी 2012 पासून हेच सांगतोय, पण कुणालाच ऐकायचं नाहीये. तुम्ही नॉर्मल लोकांना बाहेर बसवणार आणि नव्या लोकांना संधी द्याल तर हेच होणार’, असं शोएब अख्तर म्हणाला.

शोएब अख्तरची पाकिस्तान व्यवस्थापनावर टीका

शोएब पुढे म्हणाला,' तुम्ही फक्त दोन ऑलराऊंडर खेळाडूंसोबत खेळा. मुळात टीममधील खेळाडूंना काहीच माहित नाहीये. त्यांना फक्त खेळायच आहे. कस खेळाव हे त्यांना माहित नाही, काय करावं हे कोणालाच कळत नाही.', असे शोएब अख्तर म्हणाला.

कोहलीच कौतुक

शोएब अख्तर पुढे भारतीय खेळाडूंचे कौतूक केले, 'जर कोणी विराट कोहलीला सांगितलं की, त्याला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर तो पूर्णपणे तयार होऊन येईल आणि 100 रन्स करून निघून जाईल. तो आधुनिक क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज आहे. वनडे सामन्यांमध्ये पाठलाग करणारा मास्टर आहे. यात काही शंका नाहीये. तो प्रामाणिक आहे आणि त्याने 14000 रन्सही पूर्ण केलेत. मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.'