Photo Credit - X

Mumbai vs Baroda Semi Final Live Streaming:  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबई, मध्य प्रदेश, बडोदा आणि दिल्लीने सेमी फायनल गाठली आहे. या 4 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीत दोन्ही सामने हे एकाच दिवशी आणि एकाच मैदानात होणार असून मुंबई विरुद्ध बडोदात होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश आमनेसामने आहेत. मात्र मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्याकडे सर्वांच लक्ष असून दोन्ही संघात टीम इंडियाचे अनेक प्रमुख खेळाडू या सामन्यात खेळताना पहायला मिळणार आहे.   (हेही वाचा  -  Syed Mushtaq Ali Trophy 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांची झंझावाती अर्धशतकं)

मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ असे टीम इंडियासाठी खेळणाऱ्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. तर बडोदा टीममध्ये हार्दिक आणि कृणाल हे प्रमुखे खेळाडू आहेत.

कुठे पाहणार लाइव्ह सामना?

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार असून सकाळी 11 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.या सामन्यात  श्रेयस अय्यर मुंबईचं नेतृत्व करणार तर कृणाल पंड्या यांच्याकडे बडोद्याच्या जबाबदारी आहे. हा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओ सिनेमावर देखील हा सामना पाहता येईल.

पाहा दोन्ही संघ - 

मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलानी, सिद्धेश गोयल, रॉयल गोयल, जयेश लाडके. बिस्ता, साईराज पाटील, आकाश आनंद, अंगकृष्ण रघुवंशी, हिमांशू सिंग आणि एम जुनेद खान.

बडोदा टीम : .