Photo Credit- X

Mumbai Indians Ex-Player Shivalik Sharma Arrested in Rape Case: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्माला बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. जोधपूर पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथून शिवालिक शर्माला (Shivalik Sharma) अटक केली. पीडित महिलेने शिवालिक शर्मावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला (Shivalik Sharma Rape Case) आहे. दरम्यान, जोधपूर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याची पुष्टी केली. तक्रीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला.

पोलिस सध्या पुरावे गोळा करून खटला पुढे नेत आहेत. पीडित युवतीने कुडी भगतसुनी पोलिस ठाण्यात तक्रार 2 जानेवारी 2024 रोजी जोधपूरमध्ये तक्रार दाखल केली होती. शिवालिक शर्मा (27) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

युवतीचे म्हणणे आहे की फेब्रुवारी 2023 मध्ये वडोदरामध्ये तिची शिवालिकशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांमधील संभाषण वाढले आणि नंतर त्यांच्यात जवळीक वाढली. यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये शिवालिकचे आई-वडील जोधपूरला आले. त्यानंतर, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने साखरपुडा झाला. युवतीच्या रिपोर्टनुसार, जेव्हा शिवालिक साखरपुड्यानंतर जोधपूरला परत आला. तेव्हा त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तो 3 जूनपर्यंत मुलीच्या घरी राहिला आणि तिच्याशी अनेक वेळा संबंध ठेवले.

यानंतर शिवालिक तिला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन येथे घेऊन गेला. या ठिकाणीही त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि वारंवार लग्नाचे आश्वासन दिले, असा आरोप युवतीने केला आहे. पण जून 2023 मध्ये, जेव्हा युवती तिच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी वडोदरा येथे पोहोचली. तेव्हा शिवालिकच्या कुटुंबाने तो एक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे त्याला इतर ठिकाणांहूनही लग्नाचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे हा साखरपुडा मोडण्यास सांगितले आणि मुलीला घराबाहेर हाकलून लावले. तिथेही तिला धक्काबुक्की आल्याचा आरोप मुलीने केला आहे.

शिवालिक शर्मा कोण आहे?

शिवालिक शर्माचा शर्मा हा मूळचा बडोद्याच्या रहिवासी आहे. शिवालिकने 2016 मध्ये अंडर-19 ट्रॉफीमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर, त्याने 2018-19 च्या रणजी ट्रॉफी हंगामात तो बडोद्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळला. ते त्याचे पदार्पण होते. शिवालिक शर्माला 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. आता त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले आहे.