GT W vs MI W (Photo Credit - X)

WPL 2025 Playoffs Live Streaming: 11 मार्च रोजी च्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 11 धावांनी पराभव केला. तथापि, या विजयानंतरही, आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आरसीबीकडून झालेल्या या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या थेट अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही भंगल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने 15 मार्च रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात थेट आपले स्थान निश्चित केले. आता एलिमिनेटर सामना मुंबई आणि गुजरात जायंट्स (MI W vs GT W) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजेता संघ 15 मार्च रोजी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी सामना करेल.

दिल्लीचा अंतिम फेरीत

महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स 10 गुणांसह अव्वल स्थानावर होते तर मुंबईनेही 10 गुणांसह स्थान मिळवले होते परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे (0.396) दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईचा नेट रन रेट 0.192 होता. गेल्या सामन्यातील विजयासह, गतविजेत्या आरसीबीने पाच संघांच्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आपली मोहीम संपवली. (हे देखील वाचा: ICC ODI Batter Ranking: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आयसीसी रँकिंगमध्येही चमकला, घेतली मोठी झेप; तर कोहली 'या' स्थानावर)

कधी आणि किती वाजता सुरु होणार सामना?

WPL 2025 एलिमिनेटर सामना गुरुवार, 13 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे खेळला जाईल. एलिमिनेटर सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL 2025 एलिमिनेटर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतातील JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

मुंबई इंडियन्स: हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतीमणी कलिता, साईका इशाक, कीर्तन बालकृष्णन, नदीन डी क्लार्क, क्लो ट्रायॉन.

गुजरात जायंट्स: बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, हरलीन देओल, अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, काशवी गौतम, भारती फुलमाली, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, लॉरा वोल्वार्ड, डॅनियल गिब्सन, सिमरन शेख, मन्नत कश्यप, शबनम शकील, प्रकाशिका नाईक, सायली सतघरे.