कीरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल 2021च्या 42व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पंजाब किंग्सला (Panjab Kings) 6 विकेट्सने मात दिली आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबचा संघ डगमगताना दिसला. पंजाबच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून केवळ 135 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, सौरव तिवारीने संयमी खेळीने संघाचा डाव सावरला. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक खेळीने मुंबईच्या संघाला 6 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. या विजयासह मुंबईच्या संघाने स्थानावर झेप घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. पंजाबकडून सलामी देण्यासाठी आलेल्या चांगली कामगिरी करता आली नाही.  मंदीप सिंह (15) बाद झाल्यानंतर ख्रिस गेलही (1) लेगच माघारी परतला. त्यानंतर कर्णधार केएल राहुलने (21) डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, किरोन पोलार्डच्या गोलंदाजीवर त्यानेही आपली विकेट्स गमवली. त्यानंतर एडन मार्कराम आणि दीपक हुडा (28) यांनी संघासाठी धावा जमवल्या. 15व्या षटकात मार्करामने बोल्टला चौकार खेचत हुडासोबत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर फिरकीपटू राहुल चहरने मार्करामला क्लीन बोल्ड करत पंजाबला पाचवा धक्का दिला. मार्करामने 6 चौकारांह पंजाबकडून सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. ज्यामुळे पंजाबला 20 षटकात 135 बाद 135 धावा केल्या होत्या. हे देखील वाचा- Kieron Pollard: किरोन पोलार्डची जबरदस्त कामिगरी, टी-20 क्रिकेटमध्ये 10000 आणि 300 विकेट्स घेणारा ठरला ऐकमेव खेळाडू

ट्वीट-

मुंबईसाठी रोहित शर्मा (8)  आणि क्विंटन डी कॉक (27) यांनी डावाची सुरुवात केली. चौथ्या षटकात पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने मुंबईला लागोपाठ दोन धक्के दिले. त्याने आधी रोहितला मनदीपकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमारला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या सौरभ तिवारी डाव सावरला. त्याने संयमी खेळी करीत संघासाठी 45 धावा केल्या. सौरव तिवारी बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या आणि किरोन पोलार्डने तडाखेबाज फलंदाजी केली. ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला 6 विकेट्सने विजय मिळवता आला आहे.