
Women's T20 World Cup 2026: महिला टी20 विश्वचषक 2026 ची (Women's T20 World Cup 2026) तारीख अखेर जाहीर झाली आहे. आयसीसीने (ICC) त्याबाबतची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 जुलै रोजी लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, साउथहॅम्प्टनमधील हॅम्पशायर बाउल, लीड्समधील हेडिंग्ले, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल आणि ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंड आणि इतर ठिकाणी ही स्पर्धा होईल. आज गुरुवारी, १ मे रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या कार्यक्रमात ठिकाणे आणि तारखांची घोषणा करण्यात आली. चॅम्पियनशिपमध्ये 24 दिवसांत 33 सामने खेळवले जातील.
ज्यामध्ये 12 संघ असतील. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी महिला टी-20 विश्वचषकात आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. इतर संघांची निवड पात्रता फेरीतून केली जाईल.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, "2026 च्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाकडे वाटचाल करताना ठिकाणांची पुष्टी हा एक निर्णायक क्षण आहे. ही स्पर्धा जगातील सर्वोत्तम खेळाडूंना कौशल्य, उत्साह आणि खेळाडूवृत्तीच्या उत्सवात एकत्र आणते. ते पुढे म्हणाले, युनायटेड किंग्डमच्या समृद्ध विविधतेने नेहमीच सर्व संघांना उत्कट पाठिंबा दर्शविला आहे. जो आपण मागील स्पर्धांमध्ये संस्मरणीयपणे पाहिला आहे. २०१७ मध्ये लॉर्ड्स येथे झालेला महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना महिलांच्या खेळाच्या उदयातील एक महत्त्वाचा टप्पा आहे"