CSK vs KKR (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings, TATA IPL 2025 57th Match Stats: इंडियन प्रीमियर लीग 2025 त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आयपीएलच्या या हंगामात 10 संघ ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक हंगामाप्रमाणे, यावेळीही टाटा आयपीएल 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळले जात आहेत. या हंगामातील 57 वा सामना आज म्हणजेच 7 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल.

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरसाठी हा सामना करा या मरो अशा परिस्थितीचा आहे. अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी संघाला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. कोलकाता नाईट रायडर्सने या हंगामात 11 पैकी पाच सामने जिंकले आहेत. सध्या ते पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. 11 पैकी फक्त दोन सामने जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ चार गुणांसह शेवटच्या 10 व्या स्थानावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. यात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सने फक्त 11 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता.