नितीश राणा, सीएसके विरुद्ध केकेआर (Photo Credit: PTI)

KKR Likely Playing XI, IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) त्यांच्या आयपीएल (IPL) 2022 च्या मोहिमेची सुरुवात सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सामन्याने करेल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. दोन वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन नाईट रायडर्सने आयपीएल 2022 साठी एक नवीन संघ तयार केला आहे. त्यांनी शेवटचे 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते आणि आता ते त्यांच्या तिसर्‍या आयपीएल ट्रॉफीच्या निर्धारात असतील. आयपीएल 15 पूर्वी झालेल्या लिलावात केकेआरने त्यांच्या ताफ्यात मोठे बदल केले आहेत. आयपीएल लिलावापूर्वी त्यांनी त्यांच्या चार अव्वल खेळाडूंना कायम ठेवले. तर लिलावात 12.25 कोटीची बोली लावून कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचा समावेश केला. अशा परिस्थितीत आता नवीन कॅप्टन आणि बदललेल्या संघासोबत नाईट रायडर्स पहिल्या सामन्यात CSK विरोधात मैदानात उतरण्यास सज्ज असेल. (CSK Likely Playing XI, IPL 2022: ऋतुराज गायकवाड सोबत सलामीसाठी खतरनाक खेळाडूला पदार्पणाची संधी, KKR विरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंना मिळू शकते पहिली पसंती)

कोलकाताच्या संभाव्य 11 खेळाडूंबद्दल बोलायचे तर व्यंकटेश अय्यर डावाची सुरुवात करेल, परंतु त्याचा जोडीदार अद्याप स्पष्ट नाही. तथापि आरोन फिंच याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे सलामीला उतरण्याचा चांगला पर्याय दिसत आहे. नितीश राणा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांची फलंदाजी कोलकाताची मधली फळी स्थिरावलेली दिसते. सॅम बिलिंग्स आणि शेल्डन जॅकसन विकेटकिपरच्या जागेचे दावेदार असतील, तथापि, अलीकडच्या काळात बिलिंग्स हा एक उत्कृष्ट टी-20 खेळाडू म्हणून समोर आला आहे, त्यामुळे तो नक्कीच परदेशी खेळाडूंमध्ये स्थान मिळवेल. पण केकेआरने जॅक्सनची निवड केल्यास, त्यांच्याकडे मोहम्मद नबीला समाविष्ट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

अष्टपैलू म्हणून आंद्रे रसेल आणि सुनील नारायण फिट असल्यास पहिली पसंत बनतील. सुनील आणि आंद्रेचा बॅट व बॉलने फॉर्ममुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीवर परिणाम होईल. दुसरीकडे, पॅट कमिन्स सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे टिम साउदी संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि शिवम मावी व उमेश यादव साउदीला साथ देतील. तर, वरुण चक्रवर्ती एकमेव फिरकीपटू असेल.

KKR संभाव्य प्लेइंग इलेव्हन: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नारायण, टिम साउदी, उमेश यादव, शिवम मावी, आणि वरुण चक्रवर्ती.