Photo Credit- X

IPL 2025: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने गेल्या सामन्यात गोलंदाजीही केली नव्हती. त्यानंतर बुमराहला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर राहावे लागले. आता त्याच्या आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ताण थोडा वाढू शकतो. बुमराह सध्या पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 Final: पावसामुळे फायनल रद्द झाली तर कोण जिंकेल? रिझर्व्ह डेचे नियम काय? जाणून घ्या

बुमराहच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट

टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात खेळू शकणार नाही. आयपीएल 2025 च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होत नाहीये. बुमराह बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे उपचार घेत आहे. बुमराहचा वैद्यकीय अहवाल ठीक आहे. मात्र, पुढील दोन आठवड्यांत आयपीएलच्या सुरुवातीला तो गोलंदाजी करू शकेल याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बुमराह एमआयसाठी पहिले तीन किंवा चार सामने गमावण्याची शक्यता आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, “वैद्यकीय पथक हळूहळू त्याच्या खेळण्याची तीव्रता वाढवेल. "काही दिवस तो पूर्ण वेगाने गोलंदाजी करू शकत नाही. त्याला वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे."

जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधील विक्रम

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 133 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये गोलंदाजी करताना त्याने 165 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी म्हणजे 10 धावांत 5 बळी घेतले आहेत. आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 20 विकेट्स घेतल्या आहेत.