Kane, Virat And Warner (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) ची प्रतीक्षा संपणार आहे आणि भारत (India) प्रथमच एकट्याने या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. इंग्लंडनंतर एकट्याने या मेगा स्पर्धेचे आयोजन करणारा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. आता स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास उरले असून पहिल्या सामन्यात विश्वचषक 2019 चा चॅम्पियन इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड (ENG vs NZ) संघ यांच्यात आमनेसामने होणार आहेत. विश्वचषकाचा भाग बनणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. या मेगा इव्हेंटमध्ये अनेक खेळाडूंनी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे परंतु हा त्यांचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. वैयक्तिक कामगिरीसोबतच संघाला शेवटच्या वेळी विजय मिळवून देण्याचेही दडपण असेल.

1. विराट कोहली

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली 34 वर्षांचा झाला आहे. तो बऱ्यापैकी तंदुरुस्त असला तरी हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल असे मानले जात आहे. विराट हा या फॉरमॅटचा सम्राट आहे. त्याच्या नावावर 47 शतके आहेत.

2. रोहित शर्मा

भारतीय कर्णधार 36 वर्षांचा झाला आहे. हा त्याचा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक आहे. 13 वर्षांनंतर संघाला पुन्हा चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी कर्णधारावर असेल.

3. डेव्हिड वॉर्नर

वॉर्नरने दशकभराच्या कारकिर्दीत स्वत:ला महान फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारा तो खेळाडू आहे. अशा स्थितीत त्याच्या शेवटच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला त्याच्याकडून अपेक्षा असतील.

4. स्टीव्ह स्मिथ

स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात विश्वासार्ह मधल्या फळीतील खेळाडू आहे. 34 वर्षीय स्मिथ 2015 च्या विश्वविजेत्या संघात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023 Schedule: उद्यापासून सुरु होणार क्रिकेटचा महाकुंभ, वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंग यासह प्रत्येक तपशील जाणून घ्या एका क्लिकवर)

5. केन विल्यमसन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ सलग दोनदा फायनल खेळला आहे. अशा स्थितीत त्याला शेवटच्या विश्वचषकात देशाचा पहिला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकायला आवडेल.