Shreyas Iyer (Photo Credit - X)

केकेआर (Kolkata Knight Riders) ने त्यांच्या तिसऱ्या आयपीएल जेतेपदाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त खास पोस्टरमध्ये श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) फोटो न टाकल्याने सोशल मीडियावरील चाहते नाराज झाले होते. 26 मे 2024 रोजी, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून त्यांचा तिसरा आयपीएल किताब जिंकला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचे हे पहिले आयपीएल जेतेपद होते. मात्र, आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी केकेआर आणि श्रेयस अय्यर वेगळे झाले. पंजाब किंग्जने या खेळाडूला तब्बल 26.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले. 30 वर्षीय खेळाडूने 11 वर्षांत पहिल्यांदाच पंजाब किंग्जचे प्लेऑफमध्ये नेतृत्व केले आहे. सध्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब संघ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

पंजाबचा संघ पॉइंट टेवलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत झालेल्या आयपीएलच्या 9 सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे. चार गमावले आहेत.