Gujarat Titans IPL 2022: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉईंट टेबलमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. लखनौ सुपर जायंट्सवर (Lucknow Super Giants) धमकदार विजय मिळवून गुजरातच्या संघाने 18 गुण मिळवले आहेत आणि यासह आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी (IPL Playoofs) पात्र ठरणार पहिला संघ बनला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आयपीएल (IPL) 2022 मध्ये चांगली कामगिरी करत आहे. या संघाने 12 पैकी 9 सामने जिंकून प्लेऑफछे पाहिले टिकिट मिळवले आहे. गुजरात टायटन्स हा प्लेऑफसाठी अधिकृतपणे पात्र ठरणारा पहिला संघ ठरला असून त्यांनी LSG चा 62 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली. गुजरात टायटन्स यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण केले. दरम्यान गुजरातच्या कामगिरीची तीन महत्त्वाची कारणे आहेत. (LSG vs GT IPL 2022: गुजरात टायटन्स ठरला प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ; लखनौ सुपर जायंट्सला 82 धावांत केले गारद)
1. विस्फोटक फिनिशर
गुजरात टायटन्सने त्यांचे बहुतांश सामने शेवटच्या षटकात जिंकले आहेत. संघाकडे डेविड मिलर आणि राहुल तेवतियाच्या रूपाने दोन दमदार फिनिशर आहेत, जे संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतात. तेवतियाने RCB विरुद्ध खेळलेल्या मॅच-विनिंग इनिंगसह आयपीएल 2022 च्या 9 सामन्यांमध्ये 179 धावा केल्या. त्याचवेळी, मिलरने तितक्याच सामन्यांमध्ये 275 धावा केल्या आहेत. हे दोघेही क्रमवारीत मधल्या उतरून धडाकेबाज फलंदाजी करण्यात पटाईत आहेत.
2. हार्दिक ठरला उत्तम कर्णधार
आयपीएल 2022 पूर्वी, हार्दिक पांड्याला नेतृत्वाचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु या हंगामात त्याने चमकदार नेतृत्व केले आहे. तो गोलंदाजीत मोठे बदल करताना दिसला. तसेच DRS घेण्यातही त्याने अनेक वेळा हुशारी दाखवली. तो एका महान कर्णधारप्रमाणे संघाचे नेतृत्व करत आहे. याशिवाय त्याने आयपीएल 2022 च्या 9 सामन्यांमध्ये 311 धावा केल्या आहेत आणि चार विकेट्स देखील घेतल्या आहेत. हार्दिक सर्वाधिक (344) धावा करण्याच्या बाबतीत फाफ डु प्लेसिसनंतर दुसरा कर्णधार आहे.
3. गोलंदाजी ही मजबूत बाजू
गुजरात टायटन्सची गोलंदाजी अतिशय मजबूत आहे. त्यांच्याकडे गोलंदाजीचे नेतृत्व करण्यासाठी मोहम्मद शमी आहे, जो कोणताही फलंदाजी क्रम उद्ध्वस्त करू शकतो. अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन देखील मधल्या षटकांमध्ये चमकदार गोलंदाजी करतात. याशिवाय भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत, त्यामुळे इथे कहर करण्यासाठी त्यांच्याकडे राशिद खान आहे. राशिदच्या गुगलीचा सामना करणे कोणाही फलंदाजाला सोपे नाही. या गोलंदाजांच्या जोरावर संघाने प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे.