एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022 Playoffs Qualification: आयपीएलमध्ये (IPL) बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. चेन्नईचा या मोसमातील हा सातवा पराभव ठरला. या पराभवामुळे प्लेऑफ खेळण्याच्या चेन्नईच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या हंगामात बुधवार, 4 मे पर्यंत लीग स्टेजमध्ये 49 सामने खेळले गेले आहेत. सध्या पॉईंट टेबलमधील 10 पैकी 8 संघांमध्ये प्लेऑफसाठी चुरस रंगली आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी हा मोसम खूप कठीण सिद्ध झाला आहे. (IPL Playoffs and Women’s T20 Challenge 2022 Schedule: बीसीसीआयकडून IPLच्या प्ले-ऑफ आणि फायनलसह महिला T20 चॅलेंज 2022चे वेळापत्रक जाहीर)

मुंबई प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी त्यांची एक्झिट जवळपास निश्चित आहे. तसेच चेन्नईचीही अशीच परिस्थिती आहे. मुंबई संघाने आतापर्यंत 9 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे, तर सीएसकेने 10 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे, गुणतालिकेत मुंबई संघ 2 गुणांसह 10 व्या आणि चेन्नई 6 गुणांसह 9व्या क्रमांकावर आहे. इथून मुंबईच्या पलटनचे 5 आणि धोनी ब्रिगेडचे 4 सामने बाकी आहेत. या दोन्ही संघांनी आपले उर्वरित सामने जिंकले तरी मुंबईचे 12 गुण आणि चेन्नईचे 14 गुण होतील. अशा स्थितीत मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य आहे. धोनी सुपर किंग्सचे भवितव्य अमु संघाच्या विजय-पराजय, नेट रनरेट आणि उर्वरित संघांच्या गुणांवर अवलंबून असेल.

दुसरीकडे, पॉइंट टेबलवर नजर टाकली तर गुजरातचा संघ 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जवळपास पोहोचला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने 14 पॉईंटसह दुसरे स्थान काबीज केले आहे आणि प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत आता उर्वरित संघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी शर्यत सुरू आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) प्रत्येकी 12 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. राजस्थानचे आता 4 आणि आरसीबीचे 3 सामने बाकी आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांना आणखी किमान 2 सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहेत. याशिवाय पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचे हे दोन संघ समान 10-10 गुण आहेत. यामध्ये हैदराबादचे 5 आणि पंजाबचे 4 सामने बाकी आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) 8-8 गुण आहेत. दिल्लीचे 5, तर कोलकाताचे 4 सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही संघ शर्यतीत काय असून त्यांचे भवितव्य अन्य संघावर कायम आहे.