IPL 2022, GT vs SRH: तेवतिया - राशिद खानने खेचून आणला विजयश्री; Wriddhiman Saha च्या 68 धावा, गुजरात संघाचा हैदराबादवर 5 गड्यांनी रोमहर्षक विजयाची नोंद
राशिद खान (Photo Credit: PTI)

राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि राशिद खान (Rashid Khan) यांनी शेवटच्या षटकांत 22 धावा करून रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) हंगामातील पहिला विजय मिळवून दिले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 195 धावांपर्यंत मजल मारली होती, पण रिद्धिमान साहा आणि तेवतिया-राशिदच्या जोडीनी अंतिम षटकांत गुजरातले धमाकेदार विजय मिळवून दिला. अशाप्रकारे गुजरातने हैदराबादच्या सलग पाच सामन्याचा विजयरथ रोखला आणि सातव्या विजयाची नोंद केली. सनरायझर्स संघाचा आठव्या सामन्यातील तिसरा पराभव ठरला आहे. गुजरातकडून रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) सर्वाधिक 68 धावा चोपल्या. तर तेवतिया नाबाद 40 धावा करून संघासाठी विजयश्री खेचून आणला. तसेच नाबाद 31 धावांची खेळी करून राशिद खानने तेवतिया याला उत्कृष्ट साथ दिली. दुसरीकडे, उमरान मलिक (Umran Malik) हैदराबादसाठी गुजरातचे सर्व पाच विकेट घेणारा एकमेव गोलंदाज होता. (IPL 2022, GT vs SRH: आयपीएलचा नवीन वंडरबॉय अभिषेक शर्माने T20 च्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला धु..धु.. धुतलं, दोन षटकार मारत पूर्ण केले अर्धशतक; पाहा व्हिडिओ)

शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 22 धावांची गरज होती आणि हैदराबादने मार्को जॅन्सनकडे शेवटचे षटक सोपवले. पहिल्याच चेंडूवर तेवतियाने षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर धाव घेऊन राशिदला फलंदाजी दिली. रशीदने गोलंदाजाच्या डोक्यावर षटकार मारून संघाला विजयाच्या जवळ नेले. तर चौथ्या चेंडूवर रशीदला धावा करता आल्या नाहीत आणि पाचव्या चेंडूवर त्याने पुन्हा बॅट फिरवून षटकार ठोकला. तर शेवटच्या चेंडूवर राशिदने षटकार ठोकत सामना गुजरातच्या झोळी पाडला. गुजरातकडून शुभमन गिल 22 धावा आणि कर्णधार हार्दिक पांड्या 10 धावा करून बाद झाले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत पहिले स्थान पुन्हा काबीज केले, तर हैदराबाद संघाने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

यापूर्वी सनरायझर्ससाठी प्रथम फलंदाजीसाठी करताना अभिषेकने 42 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसहा 65 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच एडन मार्करमने 40 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांसह 56 धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा कर्णधार 5 धावा तर राहुल त्रिपाठी 10 चेंडूत 16 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. दोन झटपट विकेट गमावल्यावर अभिषेक आणि मार्करमच्या जोडीने 94 धावांची भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. गुजरातकडून मोहम्मद शमीने तीन बळी घेतले.