IPL 2022: ‘हा अन्याय होईल...’! संघांना ‘या’ कारणामुळे होतोय मुंबई इंडियन्सचा त्रास, फ्रँचायझींनी BCCI कडे उठवला आवाज
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची संपूर्ण आवृत्ती 2019 नंतर प्रथमच पूर्णपणे भारतात खेळली जाणार आहे. कोविड-19 चा धोका पाहता बीसीसीआयने (BCC) सर्व सामने यंदा महाराष्ट्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), ब्रेबॉर्न स्टेडियम आणि  DY पाटील स्टेडियम या स्पर्धेसाठी स्थळे म्हणून करारबद्ध करण्यात असल्याचे वृत्त समोर आले आहे. Cricbuzz च्या वृत्तानुसार या तीनही ठिकाणी एकूण 55 सामने तर पुणेच्या गहुंजे स्टेडियमवर (Gahunje Stadium) 15 सामने आयोजित केले जातील. तसेच अहवालात पुढे म्हटले आहे की सर्व संघ वानखेडे आणि DY पाटील स्टेडियमवर प्रत्येकी 4 सामने खेळले जातील. ब्रेबॉर्न स्टेडियम (Brebone Stadium) आणि पुणे तीन सामन्यांसाठी संघाचा पाहुणचार करतील. अशा परिस्थितीत BCCI च्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला होईल, ज्याच्यावर अन्य फ्रँचायझींनी आक्षेप घेतला आहे. (Mumbai Indians IPL 2022 Squad: दिग्गज खेळाडूंचा अनुभव आणि युवा जोश ने भरपूर आहे रोहित शर्माची ‘पलटन’, पहा मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ)

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाने मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर सामने खेळणारा एकमेव संघ ठरेल. आणि हे इतर आयपीएल फ्रँचायझींच्या बाबतीत चांगले गेले नाही व त्यांनी बीसीसीआयकडे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान टाईम्स ऑफ इंडियानुसार, मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडे स्टेडियम व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्टेडियमवर खेळण्यास फ्रँचायझींना कोणतीही अडचण नाही. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे स्पर्धेच्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही आणि मुंबई इंडियन्स संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला दिले जातात की नाही हे पाहणे शिल्लक आहे. “इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानात सामने मिळत नाहीत. मुंबई इंडियन्सने त्यांचे बरेच सामने वानखेडेवर खेळले तर ते अन्यायकारक ठरेल, जे अनेक वर्षांपासून त्यांचा अड्डा बनला आहे. फ्रँचायझींनी याबाबत आक्षेप घेतला आहे. मुंबई इंडियन्सचे बहुतांश सामने DY पाटील स्टेडियम आणि पुण्यात खेळण्यात फ्रँचायझींना काही अडचण नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमही ठीक आहे. आशा आहे की बीसीसीआय या प्रकरणाकडे लक्ष देईल,” TOI द्वारे फ्रँचायझी सूत्राने उद्धृत केले.

उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी कोणत्या संघाला घरच्या मैदानाचा फायदा मिळाला नव्हता आणि कोविड-19 मुळे स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी लीग स्टेजचे सामने तटस्थ ठिकाणी खेळले गेले होते. आयपीएल 15 च्या वेळापत्रकाची अजून औपचारिक घोषणा केली नसून आगामी स्पर्धा मार्च ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात खेळवली जाईल असे वृत्त समोर आले आहे.