IPL 2022 Final: ‘या’ दिग्गज फलंदाजांच्या नावावर IPL फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड, तोडण्यासाठी गाळावा लागेल भरपूर घाम
चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना (Photo Credit: Twitter)

IPL 2022 GT vs RR Final: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आता आयपीएलचा (IPL) भाग नाही, पण त्याने असे काही विक्रम केले आहेत ज्यांचा उल्लेख न करता आयपीएल फायनल (IPL Final) थोडी अपूर्णच वाटते. रैना गेल्या मोसमात या लीगचा भाग होता आणि यावेळी तो 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात उतरला होता , परंतु कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. रैना अनसोल्ड राहिला पण समालोचक म्हणून तो या लीगशी अजूनही संबंधित आहे. ‘’मिस्टर आयपीएल’ म्हणून प्रसिद्ध सुरेश रैनाच्या नावावर आतापर्यंत आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs in IPL Final) करण्याचा विक्रम आहे, जो अजूनही कोणत्याही फलंदाजाला मोडता आलेला नाही. (IPL 2022 Final: पहिल्या संधीतच गुजरात मारणार बाजी, ‘या’ 5 कारणांमुळे डेब्यू सिझनमध्ये बनू शकते आयपीएल चॅम्पियन)

रैनाने आतापर्यंत आयपीएल फायनलमध्ये एकूण 249 धावा केल्या असून तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनंतर 236 धावा करून चेन्नई सुपर किंग्सचा माजी सलामीवीर शेन वॉटसन या लीगच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत रोहित शर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हिटमॅन’ने आतापर्यंत आयपीएलच्या अंतिम सामन्यांमध्ये एकूण 183 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रैनाचा आतापर्यंत अबाधित राहिलेला रेकॉर्ड मोडण्यासाठी फलंदाजांना कंबर तोड मेहनत करावी लागणार आहे. याशिवाय आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर असून त्याने एकूण 10 विकेट घेतल्या आहेत. तर मिचेल जॉन्सन 7 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अल्बी मार्कल, शार्दुल ठाकूर आणि लसिथ मलिंगा 6-6 विकेट्ससह संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर विराजमान आहेत.

आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 6 फलंदाज-

249 - सुरेश रैना

236 - शेन वॉटसन

183 - रोहित शर्मा

181 - मुरली विजय

180 - एमएस धोनी

जवळपास दोन महिन्यांच्या लढतीनंतर, इंडियन प्रीमियर लीगची 2022 आवृत्ती निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, जिथे नवोदित गुजरात टायटन्स आणि उद्घाटन चॅम्पियन राजस्थान रॉयल्स रविवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चमचमीत आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. राजस्थानला 14 वर्षानंतर जेतेपद जिंकण्याची संधी आहे, तर गुजरात पदार्पणात चॅम्पियनशिप जिंकणारा दुसरा संघ ठरू शकते.